छावणी श्री गणेश महासंघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण...

छावणी श्री गणेश महासंघाच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण...
उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल दाभाडे यांचा पुढाकार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज) - पडेगाव येथील महानगरपालिका प्राथमिक शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने छावणी श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण बुधवारी (दि.3) करण्यात आले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष विशाल दाभाडे, कार्याध्यक्ष रखमाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विविध कलागुण स्पर्धेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन सय्यद जाकेर यांनी केले. कार्यक्रमास दादाराव शेजवळ, हारून भाई, श्री.डोंगरे साहेब, चंद्रकांत पेहरकर, संतोष शिंदे,कपिल शेजवळ, देव भैया यलदी अजीम भाई आदी मान्यवर उपस्थित होते..शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. शिक्षक विनोद वटणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपत गरजू, होतकरू,मुलांना बक्षीस आणि शालेय साहित्य वाटप केले. शाळेच्या वतीने मान्यवरांचे आभार मानण्यात आले.
What's Your Reaction?






