मुस्लिम आरक्षण आंदोलन तीव्र होणार, 13 ऑक्टोबर पासून मुंबईपर्यंत लाॅन्ग मार्च
मुस्लिम आरक्षण आंदोलन तीव्र होणार, 13 ऑक्टोबर पासून मुंबईपर्यंत लाॅन्ग मार्च...
मुस्लिम आरक्षणासाठी 22 दिवस चालणार पायी प्रवास, राज्यात मनोज जरांगे पाटील हे जाहीर सभा घेऊन आंदोलन तीव्र करत आहे तर आता मुस्लिम आरक्षण आंदोलन पेटण्याची शक्यता आहे...
औरंगाबाद, दि.8(डि-24 न्यूज) मराठा व ओबीसी आरक्षण तीव्र होत असताना आता मुस्लिम आरक्षण आंदोलन राज्यात तीव्र होणार आहे. 13 ऑक्टोबर पासून औरंगाबाद येथील ऐतिहासिक आमखास मैदान येथून दुपारी दोन वाजता मुंबई मंत्रालयापर्यंत मुस्लिम आरक्षण व संविधान बचाओ रैली काढण्यात येणार आहे. हा लाॅन्ग मार्च पायी असणार आहे. मायनाॅरीटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या वतीने हा लाॅन्ग मार्च काढण्यात येणार आहे. जावेद कुरैशी यांच्या नेतृत्वाखाली हा लाॅन्ग मार्च मध्ये शेकडो मुस्लिम समाजातील व्यक्ती जे 27 वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढत आहे ते सहभागी होणार आहे. मायनाॅरीटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी आमदार सिराज देशमुख या आंदोलनात सहभागी होणार आहे.
जावेद कुरैशी यांनी डि-24 न्यूजला माहिती देताना सांगितले आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. त्या समाजात सुध्दा गरीब व गरजू लोक आहेत त्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची भूमिका आहे. कायद्यात तशी केंद्र सरकारने तरतूद करावी. सरकारने नियुक्त केलेल्या मुस्लिम अल्पसंख्याक समाजासाठी विविध आयोग व कमिटीने दिलेल्या अहवालात हा समाज हा आर्थिक सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात मागास आहेत. म्हणून या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे. या दोन मागणीसाठी 13 ऑक्टोबर पासून पायी चालत दर दिवशी 20 कि.मी. शेकडो लोक चालणार आहे. आंदोलनाला परवानगी मिळाली आहे. लाॅन्ग मार्चच्या मार्गावर विविध गावांमध्ये व शहरात जाहीर सभा घेत आरक्षणाबाबत जनजागृती करणार आहे. समाजाचे युवक व नागरीकांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. शांततेच्या मार्गाने हा लाॅन्ग मार्च काढण्यात येणार आहे. राजकीय पक्षांनी मते घेण्यासाठी आरक्षणाचा वापर करु नये जसे निवडणूका जवळ येत आहे विविध समाजाचे आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असताना मुस्लिम अल्पसंख्याक समाज शांत कसा बसणार असा प्रश्न त्यांनी राजकीय पक्षांना विचारले आहे. मागिल 27 वर्षांपासून मायनाॅरीटी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आरक्षणाचा लढा देत आहे. ज्या पक्षांची सत्ता आली फक्त आश्वासन दिले. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता जाताजाता पाच टक्के आरक्षणाचा निर्णय घेतला पण कायदा बनवला नसल्याने ते आरक्षण टिकले नाही. आता टिकणारे आरक्षण मिळावे अशी आमची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडी व समाजवादी पार्टी आणि विविध सामाजिक संघटनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. केंद्र व राज्य सरकारने तात्काळ या समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी मुंबई मंत्रालय येथे हा लाॅन्ग मार्च 3 नोव्हेंबर 2023 पर्यंत पोहोचणार आहे. सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडू अशी माहिती जावेद कुरैशी यांनी दिली आहे.
What's Your Reaction?