ब्राह्मण समाजाचे महामंडळ स्थापन झाले नाही तर नोटाला मतदान करणार, ढोल बजाओ आंदोलनात इशारा

 0
ब्राह्मण समाजाचे महामंडळ स्थापन झाले नाही तर नोटाला मतदान करणार, ढोल बजाओ आंदोलनात इशारा

"ब्राह्मण समाजाच्या सर्व संघटना चे ढोल बजाओ आंदोलन यशस्वी"

"मंत्री अतुल सावे 15 दिवसांत परशुराम आर्थिक महमंडळाची अधिकृत घोषणा करून जी आर काढणार" असे दिले आश्वासन 

औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे व त्याचा जी आर तात्काळ काढण्यात यावा यामागणीचे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी कॅबिनेट मंत्री अतुलजी सावे यांच्या बजरंग चौक मुख्य कार्यालया समोर सर्व संघटनांच्या

प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थित मध्ये ढोल बजाव आंदोलन यशस्वी झाले.

यावेळी मंत्री अतुल सावे यांनी सर्व संघटना पदाधिकारी यांना संबोधित करताना सांगितले की येणाऱ्या 15 दिवस मध्ये मी स्वतः मंत्रालयात आर्थिक विकास महामंडळ बाबत पाठवपुरावा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून अधिकृत ब्राह्मण समाजाच्या महामंडळची घोषणा करून जी. आर. काढणार असल्याचे यावेळी सर्वच संघटना पदाधिकारी

सोबत चर्चा करताना सांगितले.

पुढील 15 दिवस मध्ये जी आर काढला नाही तर महाराष्ट्रातील सर्वच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल,असे सर्वच संघटना ब्राह्मण पदाधिकारी तर्फे सांगण्यात आले.

मंत्रालयातून अधिकृत घोषणा न झाल्यास आगामी सर्वच निवडणूक मध्ये ब्राह्मण समाज मतदानावर बहिष्कार टाकून नोटाला मतदान करणार असल्याचेही यावेळी सर्व ब्राह्मण संघटना पदाधिकारी यांनी सांगितले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता संजय सुपेकर,

सुरेश काका मुळे, गजानन जोशी बीड,

अशिष दादा सुरडकर, पंकजजी पाठक, लक्ष्मीकांत केशवराव पांडे, अविनाश जोशी पालामकर,

मंदार देसाई, लक्ष्मीकांतजी जयपुरकर, संजय टोणपे, सुधीर नाना नाईक , साकेत खोचे,

दीपक कुलकर्णी, संतोष पंचभय्ये, डॉ शैलेश देशपांडे, जयश्री कुलकर्णी, निता देशपांडे, स्मिता जगबदे, शामकांत न्यायाधीश, दिनकर देशपांडे हे उपस्थित होते.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow