प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन, लखनौच्या रुग्णालयात निधन
प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे निधन, लखनौच्या रुग्णालयात निधन
लखनौ, दि.14(डि-24 न्यूज) प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे आज एसजीपीजीआई रुग्णालयात दु:खद निधन झाले. ते काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या निधनाची बातमी जेव्हा त्यांच्या मुलाने दिली त्यांच्या देश विदेशातील चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.
तब्येत बिघडल्याने त्यांना 9 जानेवारीला आयसियूत भरती करण्यात आले होते. अगोदर दोन दिवस त्यांना लखनौ येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांची किडनी निकामी झाल्याने त्यांच्यावर डायलिसिस सुरु होते. त्यांना क्रोनिक किडनिचा आजार होता. छातीत दुखत असल्यामुळे व निमोनिया झाल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता म्हणून त्यांना डॉक्टरांकडे नेले होते. आयसियूत ते ऑक्सिजनवर होते. आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. मुनव्वर राणा हे देशातील प्रसिद्ध शायर, साहित्यिक व कवी होते. त्यांना साहित्यातील अकादमी पुरस्कार व माटी रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरात ते अनेकदा मुशायरासाठी आले होते. त्यांची शायरी ऐकण्याचा योग शहरवासीयांना आला होता. शायरीच्या दुनियेतील मोठा शायर गमावला अशी भावना त्यांचे चाहते व्यक्त करत आहे.
What's Your Reaction?