मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी यंदा खासदार महायुतीचाच, मेळाव्यात निर्धार
महायुतीच्या पहील्याच मेळाव्यात लोकसभा जिंकणारच पण पाण्याचे काय...!
कराडांनी उद्घाटन उरकल्याने पालकमंत्री भुमरे नाराज तर महिलांना ना व्यासपीठ ना बॅनरवर फोटो... राष्ट्रवादीचे महिला जिल्हाध्यक्षा स्वाती कोल्हे यांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली... व्यासपीठावर नाराजी नाट्य तर आठवलेंच्या विनोदाने भरला मेळाव्यात रंग तर प्रा.जोगेंद्र कवाडेंचे लाखमोलाचे मार्गदर्शन... उमेदवारी वरुन टोलेबाजी... अब्दुल सत्तार यांना द्या जवाबदारी तर सिरसाट नाराज म्हणाले लोकसभेला सहकार्य करु पण आमच्या निवडणुकीत सुध्दा लक्ष द्यावे लागेल... लोकसभेच्या निवडणुकीत भगवा फडकवायसाठी घटकपक्षांत एकजूट दाखवण्याचे नेत्यांचे आवाहन....पुढचा मेळावा भव्य दिव्य होणार... पालकमंत्र्यांची घोषणा...
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) 2024 च्या निवडणुकीत भगवा फडकवायसाठी महायुतीच्या घटक पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता एकजूट दाखवून केंद्र व राज्य सरकारच्या वतीने झालेली कामे जनतेला सांगा. औरंगाबादचे नाव आता छत्रपती संभाजीनगर नामांतर केले. आता काळजी करू नका. हिंदूत्व वादी पक्ष महायुतीत आहे आता देशातून चारशे पार व राज्यातून 45 पार करण्यापासून कोणी रोखणार नाही. अयोध्येत 22 जानेवारीला जय श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. 22 ते 26 जानेवारी पर्यंत उत्साहाचे व जल्लोषाचे वातावरण राहणार आहे. शहरातून अयोध्येत दोन ते चार ट्रेन भरुन राम भक्तांना पाठवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला विकासाच्या दिशेने नेत आहेत. विकसित भारताची संकल्पना त्यांनी मांडली. जिल्ह्यात 25 हजार कोटींच्या विकासकामे सुरू आहे. गॅस पाइपलाइन, पाण्याची व विविध विकासकामांची कामे सुरु आहे. अशी माहिती तापडिया नाट्य मंदिर येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिली. त्याला गती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने निधी उपलब्ध करून देत आहे. पाण्याचा प्रश्न एका वर्षात निकाली निघणार आहे. महापालिकेला नवीन पाणीपुरवठा योजनांत आपला 800 कोटींचा हिस्सा भरण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने राज्य शासन भरणार असल्याची ग्वाही रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.
येणाऱ्या काही दिवसांत भव्य मेळावा होणार आहे असेही भुमरे म्हणाले. खैरेंचे नाव न घेता त्यांनी टिका केली. महायुतीचा उमेदवार कोणीही असो त्याला निवडून आणून महाविकास आघाडीला धडा शिकवू. विधानसभा निवडणुकीत व सर्व निवडणुकीत पराभूत करु असा विश्वास भुमरेंनी व्यक्त केला.
या मेळाव्यात केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या कविता, विनोदी भाषणाने हशा पिकला. त्यांनीही आपली भुमिका मांडताना सांगितले महायुती भक्कम आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जो उमेदवार निश्चित होईल रिपाइंचे कार्यकर्ते निवडणूक आणण्यासाठी प्रचारात उतरतील. सरकार तीन चाकांचे नाही तर रिपाइं मिळून चार चाकांचे म्हणावे. काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर सुध्दा त्यांनी टिका करताना सांगितले राहुल गांधींनी पंतप्रधान नाही बनावे यासाठी त्यांचा मुकाबला करण्यासाठी मला मोदींनी जवाबदारी दिली आहे. म्हणून मोदीच तिस-यांदा पंतप्रधान बनतील असा विश्वास व्यक्त केला. तर इंडिया आघाडीवर टिका केली. बरं झालं नार्वेकरांची जवाबदारी बागडेंवर निकाल देण्याची जबाबदारी मिळाली नाही. यावेळी हशा पिकला .....
राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी शहराच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला. शहराला आठ दिवसाआड पाणी मिळत आहे मग महायुतीचा उमेदवार निवडून आणायचे असेल तर हा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा लागेल. नागपूर येथे भरपूर विकासाची कामे सुरु आहेत. मुंबई , नागपूर पुण्यासारख्या विकासाची कामे व्हावीत म्हणून जनतेमध्ये जावे लागेल. उमेदवाराची निवड व विजयी करण्याचे सर्व डावपेच मंत्री अब्दुल सत्तार यांना अवगत आहे त्यांना जवाबदारी द्यावी असा प्रस्ताव सतीश चव्हाण यांनी ठेवला तर त्यावर आमदार संजय सिरसाट यांनी आपत्ती जाहीर केली म्हणाले दाल में कुछ काला है या फिर दाल ही काली है म्हणत सांगितले उमेदवारी कोणालाही मिळो एकदिलाने काम करावे लागेल. पण लोकसभा निवडणूक संपली तर बाजूला व्हायचे नाही आमच्या निवडणुकीकडे सुध्दा बघावे लागेल तसेच जिल्हा परिषद, महापालिका, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूकीत सुध्दा लक्ष द्यावे असे आवाहन महायुतीच्या घटक पक्षांकडे त्यांनी केले. यंदा महायुतीचाच खासदार निवडून येणार यासाठी जोमाने कामाला लागा असा सल्ला त्यांनी मेळाव्यात पदाधिकारी यांना दिला. सिरसाट यांनी आपल्या भाषणात विरोधकांवर यावेळी टिका. केली पिंपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार प्रा.जोगेंद्र कवाडे म्हणाले संविधान बदलणार नाही असे आंबेडकरी जनतेला महायुती व भाजपाने पटवून देऊन विश्वास निर्माण करावा. हे सरकार आपले आहे. दिन दलित बहुजनांचे कोणावर अन्याय होणार नाही यासाठी जनतेत जाऊन भाजपाने भुमिका सांगावी. संविधान बदलणार अशा वावड्या उठवले जाते आहे त्यांना उत्तर दिले पाहिजे. महायुती कोणताही उमेदवार दिला तरी निवडून आणू पण तो उमेदवार मानवतावादी असायला हवा असे कवाडेंनी मार्गदर्शन करताना सांगितले. आपल्या भाषणात कवाडे व सतीश चव्हाण यांनी शहराचे नाव औरंगाबाद उल्लेख केला त्यांना उत्तर देताना सिरसाट म्हणाले होईल सवय पण विचार तेच आहे ते बदलणार नाही.
या मेळाव्यात महायुतीच्या नेत्यांनी निर्धार केला की मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याचा संकल्प आहे. पक्षश्रेष्ठी कोणताही उमेदवार देवो निवडून आणण्यासाठी एकजुटीने निर्धार केला.
या मेळाव्यात आमदार प्रदीप जैस्वाल, आ.प्रा.रमेश बोरनारे, आ.हरिभाऊ बागडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्य अभिजित देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट, जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय ठोकळ, शहराध्यक्ष नागराज मंजुळे, जालिंदर शेंडगे व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
What's Your Reaction?