मध्य विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी देणार मुस्लिम उमेदवार...?, डॉ.शोएब हाश्मींना मिळणार का संधी...?
औरंगाबाद मध्य मधून महाविकास आघाडी मुस्लिम उमेदवार देणार, डॉ.शोएब हाश्मींना मिळणार का संधी...?
छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.4(डि-24 न्यूज) आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी व सामाजिक उपक्रम औरंगाबाद मध्य मतदारसंघात सुरू केली आहे. महाविकास आघाडी या मतदारसंघातून सक्षम मुस्लिम उमेदवार देणार असल्याची माहिती डि-24 न्यूजच्या सुत्रांकडून मिळाली आहे. या मतदारसंघातून सध्या शिंदे सेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल आहे. शिवसेनेची हि जागा परंपरागत असल्याने हि जागा महाविकास आघाडीत उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटू शकते. या मतदारसंघातून एकदा अपक्ष म्हणून आमदार प्रदीप जैस्वाल, एकदा एमआयएमचे इम्तियाज जलील व त्यानंतर पुन्हा शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांना येथील मतदारांनी निवडून दिले होते. या मतदारसंघातून मुस्लिम मते निर्णायक असल्याने उच्चशिक्षित नवीन चेहरा व शिवसेनेचे जिल्हा संघटक डॉ.शोएब हाश्मी यांना उमेदवारी द्यावी अशी चर्चा शिवसेनेच्या गोटात सुरू आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन ते रुग्णसेवा सोबतच राजकारणात पूर्ण वेळ देत असल्याने पक्षांकडून त्यांना संधी मिळू शकते अशी चर्चा शहरात आहे. डॉ.शोएब हाश्मी हे एशियन हाॅस्पिटलचे संचालक आहेत. उध्दव सेनेने या मतदारसंघात विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधनी व विविध बैठका घेऊन निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मराठवाडा व राज्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेची विविध घटकांसोबत मुस्लिम समाजानेही मशाल पेटवून शिवसेनेचे 9 खासदार निवडून दिले तोच उत्साह कायम ठेवण्यासाठी एकजूट दाखवून महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.
What's Your Reaction?