नामविस्तार दिनानिमित्त अभिवादनासाठी भिमसागर उसळला...!
नामविस्तार दिनानिमित्त अभिवादनासाठी भीमसागर उसळला...
विद्यापीठ गेटवर आंबेडकरी अनुयायी नतमस्तक
औरंगाबाद, दि.14(डि-24 न्यूज) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 30 व्या नामविस्तार दिन उत्साहमय वातावरणात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. आज सकाळपासून आंबेडकरी अनुयायांची पाऊले विद्यापीठ प्रवेद्वाराकडे वळल्याचे पाहावयास मिळाले. नवीन विद्यापीठ गेटसमोर असलेल्या डॉ. बाबासाबेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पांढरेशुभ्र वस्त्र परिधान केलेल्या भीमअनुयायासह भिमसैनिकांनी अभिवादन केले. त्यानंतर विद्यापीठ प्रवेशव्दारा समोर असलेल्या शहिद स्तभांला मानवंदना देत विद्यापीठ प्रवेशव्दारा समोर आपला माथा टेकत धन्य झाल्याचे चित्र रविवारी पाहावयास मिळाले.
राज्यतील विविध ठिकाणाहून आपल्या कुटुंबासह आलेल्या बाबासाहेबांची श्रध्दापुरक शिका संघटीत व्हा संघर्ष करा मुलमंत्र जपल्याचे पाहायला मिळाले. देशात अनेक विद्यापीठ आहेत मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे एकमेव असे विद्यापीठ आहे की ज्या विद्यापीठाच्या प्रवेशव्दाराची पुजा केली जाते.
अभिवादनसाठी रिघ
विविध पक्ष संघटनाचे पदाधिकारी तसेच विविध भागातून आलेले आंबेडकरी अनुयायांनी सकाळपासून विद्यापीठ प्रवेशव्दाराकडे वाटचाल सुरू केली होती. आपल्या मुलाबाळासह आलेल्या आंबेडकरी अनुयायांंनी मोठया शिस्तीत विद्यापीठ प्रवेशव्दारा समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. येणारा प्रत्येक अनुयायी हा शिस्तीत रांगेत उभा राबून अभिवादन करण्यासासाठी जात होता. बौद्ध भिक्खू महासंघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. अभिवादन करण्यासाठी येणा-या अनुयायांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केले होते. शनिवारी रात्री पासूनच विद्यापीठ प्रवेशव्दारावर भीमसैनिकाची तूफान गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. सुंदर लायटिंग लावण्यात आली. दरम्यान विद्यापीठ प्रवेशव्दारा समोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांना बाबासाहेबांचे अनुयायी दिसून आले. भल्या पहाटे पासूनच विद्यापीठ प्रवेव्दारावर जाणा-या भीम अनुयायाची मोठया प्रमाणात येत होते. वेगवेगळ्या पक्ष संघटनांचे व्यासपीठ सजले होते. यावेळी दलित चळवळ व विविध पक्षांचे, संघटनेच्या नेत्यांची भाषणे झाली. नामांतर लढ्याच्या आठवणी जाग्या झाल्या. आलेल्या भीम अनुयायानी बाबासाहेबांच्या पुतळयाला अभिवादन केल्यानंतर विद्यापीठ प्रवेशव्दारा समोरील नामांंतर लढयात शहिद झालेल्या शहिद स्तंभाला अभिवादन केले. त्यानंतर अनेकांनी विद्यापीठ प्रवेशव्दाराला आपला माथा टेकून बाबासाहेबां बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सोशल मिडियावर शुभेच्छाचांचा वर्षाव
सोशल मिडियाच्या विविध ग्रुपवर शनिवारी रात्री पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देणा-याची धूम होती. अनेकांनी सोशल मिडियावर बाबासाहेबांचे सुरेख अशा फोटोसह विद्यापीठ प्रवेशव्दाराचे छायाचित्र टाकून एकमेकांना शुभेच्छा दिल्याचे दिसून आले.
What's Your Reaction?