विशालगडच्या हिंसक घटनेवर पत्रकार परिषदेत भडकले इम्तियाज जलील...!

 0
विशालगडच्या हिंसक घटनेवर पत्रकार परिषदेत भडकले इम्तियाज जलील...!

विशालगडच्या हिंसक घटनेवर भडकले इम्तियाज जलील

संभाजीराजे हिंसेचे नेतृत्व करतात ते खरे शाहु महाराजांचे वंशज आहेत का...? इम्तियाज जलील यांचा सवाल...

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.15(डि-24 न्यूज) कोल्हापूरच्या विशालगडमध्ये घडलेल्या हिंसक घटनेचे नेतृत्व करत होते का शाहु महाराजांचे वंशज. अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया आहे. तलवार हातात घेऊन घरात आया बहीणी लहान बालकांना मारहाण करणे हे शोभा देते का महाराष्ट्राच्या सांस्कृतिला. हि आहे का आपली संस्कृती. एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळाची पण या घटनेत नासधूस करण्यात आली. गाड्या जाळण्यात आले. कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली. सामान घराबाहेर फेकले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की दोषींवर कारवाई करावी. पोलीसांवर पण या घटनेत मारहाण करण्यात आली हे राज्याचे दुर्देव आहे. ज्यावेळी अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू झाली त्यावेळी पोलीस पण होते हिंसक घटना घडली रोखण्याचा प्रयत्न केला गेला नाही. दोषींना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज यांना निवडून देण्यासाठी मुस्लिम धर्मगुरुंनी आवाहन केले होते त्यांना निवडून देण्याचे मग या घटनेच्या वेळी शाहु महाराज कोठे होते. हसन मुश्रीफ, बंटी पाटील कोठे होते. मतांसाठी मुस्लिम लागतात आणि त्यांच्यावर अन्याय झाला तर कोणीही समोर आले नाही असा आरोप पत्रकार परिषदेत इम्तियाज जलील यांनी लावला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार, वंचित आणि एमआयएम या पक्षांची तिसरी आघाडी होणार आहे का या प्रश्नावर त्यांनी सांगितले काही दिवसांत असे राजकीय समीकरणे बणली तर विचार करु. पक्षाचे अध्यक्ष बॅ.असदोद्दीन ओवेसी आघाडी सोबत जायचे किंवा नाही अथवा स्वबळावर निवडणूक लढणार ते निर्णय घेतील. पक्षाच्या वतीने ज्या ठिकाणी ताकत आहे तयारी सुरू केली आहे असे त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow