एमआयएमच्या गडात होणार वंचितची जाहीर सभा...
एमआयएमच्या गडात होणार वंचितची जाहीर सभा....
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद),दि.12(डि-24 न्यूज)- आगामी महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर होण्याच्या अगोदर शहराचे राजकारण थंडीत तापायला लागले आहे. महापालिका प्रभागाची सोडत झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा एमआयएमच्या गडात रहेमानिया काॅलनी येथे 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता वंचितचे नेते सुजात आंबेडकर संबोधित करणार आहे. यासोबतच वंचितचे नेते अमित भुईगळ, जावेद कुरेशी, अफसरखान यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती शहराध्यक्ष मतीन पटेल यांनी दिली आहे.
What's Your Reaction?