अब्दुल सत्तार यांचे काँग्रेसमध्ये घरवापसीचे संकेत, नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळेंचा केला सत्कार
अब्दुल सत्तार यांचे काँग्रेसमध्ये घरवापसीचे संकेत, नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळेंचा केला सत्कार
औरंगाबाद, दि.6(डि-24 न्यूज) शिवसेनेचा माझा प्रासंगिक करार आहे. ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा माझ्यावरील विश्वास त्यादिवशी मी योग्य निर्णय घेईल. असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसमध्ये घरवापसीचे संकेत दिल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे.
त्यांनी आज जालन्याचे विजयी खासदार डॉ.कल्याण काळे यांचा सत्कार करुन भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना हे विधान केल्याने खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यापासून वेगळे होण्याचे संकेतच त्यांनी यावेळी दिले. आमच्यातील करार संपुष्टात येईल असे ते म्हणाले.
जे 2019 मध्ये घडले त्याचे सुत्रधारही शिंदे होते. तेव्हा शिंदे जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
त्यांनी पुढे सांगितले मी रावसाहेब दानवेंसाठीच काम केले पण कार्यकर्ते व मतदारांच्या मनात डाॅ.कल्याण काळे होते. जरांगे फॅक्टरमुळे दानवेंचा पराभव झाला. सिल्लोड मतदारसंघात दानवेंना लीड मिळाली नाही असा आरोप माझ्यावर लावला जात आहे परंतु मतमोजणीचा अभ्यास केला तर असे लक्षात येईल पैठण व भोकरदन येथूनही दानवेंना कमी मते मिळाली. गेल्या विधानसभा निवडणुकीत दानवेंची साथ मिळाली नाही म्हणून कार्यकर्ते नाराज होते त्यांनी काळेंचे काम केले असे अब्दुल सत्तार यांनी कबूल केले. जालन्यात मनोज जरांगेंचा प्रभाव होता. मी सिल्लोडमध्ये दानवेंसाठी 17 सभा घेतल्या. त्यावेळी त्यांना सांगितले आमचे कार्यकर्ते नाराज आहेत. आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी पैठण मधून कीती मते मिळाली हे पहावे. महायुतीच्या विरोधात काम केले असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचे डॉ.कल्याण काळे यांचे काम करत मदत केली असल्याचे त्यांनी मान्य केले. कारण दानवेंनी विधानसभेत मदत न केल्याची भावना निर्माण झाली होती. रावसाहेब दानवे हे जवळचे मित्र आहे पण कल्याण काळे हे मनातील मित्र असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले यामुळे काळेंच्या माध्यमातून पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
What's Your Reaction?