सु-लक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेला सामाजिक संस्था उपक्रमशील ज्ञानवंत पुरस्कार
सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेला उपक्रमशील सामाजिक संस्था ज्ञानवंत पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान...
सुमित पंडित हे समाज उपयोगी विविध 42 उपक्रम राबवत तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत....
औरंगाबाद, दि.23(डि-24 न्यूज) देवकाई प्रतिष्ठान व मिताली फाॅऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा मानाचा उपक्रमशील सामाजिक संस्था ज्ञानवंत पुरस्कार महा ग्लोबल
राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा 2024 यांच्या तर्फे करिअर महोत्सवा निमित्ताने विवीध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आली. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी जळगावचे माजी महापौर जयश्रीताई महाजन उपस्थित होत्या. कार्यक्रमास विषेश आकर्षन चार्ली फाउंडेशनचे कलाकार यांनी चार्ली चाॅप्लिनच्या मुख अभिनयाद्वारे जनजागृती केली. उपक्रमशील सामाजिक संस्था ज्ञानवंत पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय समाज उपयोगी कार्य करणारी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या माणुसकी समुहाचे समाजसेवक सुमित पंडित व समाजसेविका पुजा पंडित यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ते करीत असलेल्या रजंल्या गांजल्याची सेवा खरोखरच समाजापुढे वाखानण्या जोगी आहे, रस्तावर फिरणाऱ्या मनोरुग्णाची दाढी केस कापुन स्वच्छ अंघोळ घालुन त्यांना मनोविकृती रुग्णालयात दाखल करतात, गरजु रुग्णांना अर्ध्या रात्री वैद्यकीय साहित्य, भोजन, रक्त, पुरविण्यात ही जोडी देवदुतासारखी मदतीला धावुन जाते, बेवारसांचे अंत्यविधी सुध्दा हे दापत्य माणुसकी समुहाच्या माध्यमातून करतात, पुजा पंडित सध्या बेवारस वृद्धानसाठी वृध्दाश्रम चालवतात त्यांनी औरंगाबाद येथे माणुसकी वृध्द सेवालयात वृध्दाच्या सेवेसाठी मदतकार्य करतात,म्हणून त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत सु-लक्ष्मी बहुद्देशीय सेवाभावी संस्थेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. हा सोहळा जळगाव येथे दिनांक 21 जानेवारी रविवारी रोजी जळगाव येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश दाते माजी वायुसेना अधिकारी, राजुमामा भोळे आमदार जळगाव, जयश्रीताई महाजन माजी महापौर जळगाव, सचिन कुमावत सीने अभिनेते उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन विनोद महाजन, अध्यक्ष मिताली फाऊंडेशन, सुनील दाभाडे, देवकाई प्रतिष्ठान पंकज दादा नाले यांनी केले होते. यावेळी पुरस्कार स्विकारताना माणुसकी समुहाचे कमलाकर महाजन(माळी), चेतन पाटील, सुमित पंडित आदी उपस्थित होते.
ह्या पुरस्कारामुळे समाजात सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व सुमित पंडीत व सौ पुजा सुमित पंडीत यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
What's Your Reaction?