दामिनी पथकातील महीला कर्मचा-यांसोबत अंबादास दानवे यांचा राखी पौर्णिमा सण साजरा

दामिनी पथकातील महिला कर्मचाऱ्यांसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राखी पौर्णिमा सण साजरा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9 (डि-24 न्यूज) : संभाजीनगर दामिनी पथकातील महिला कर्मचारी व अधिकारी यांच्यासमवेत आज राखी पौर्णिमाचा सण साजरा केला. महिला अधिकारी यांनी दानवे यांना राखी बांधून रक्षाबंधन सणाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रातिनिधिक स्वरूपात पाच महिला अधिकारी यांनी अंबादास दानवे यांना राखी बांधली. राखी पौर्णिमा सणाला बहिणीने औक्षण केल्यानंतर सणाच्या परंपरेनुसार भाऊ बहिणीला भेट वस्तू देतो. त्याचप्रमाणे दानवे यांनी औक्षण केल्यानंतर महिला कर्मचारी यांना भेट वस्तू दिल्या..आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा सण साजरा झाला.
What's Your Reaction?






