चार वर्षांच्या थालेस्मिया आजाराने ग्रस्त बालिकेला उपचारासाठी केली आर्थिक मदत

चार वर्षांच्या थालेस्मिया आजाराने ग्रस्त बालिकेला उपचारासाठी केली आर्थिक मदत
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि.13(डि-24 न्यूज) बायजिपूरा येथील चार वर्षाची बालिका अनम असलम बागवान हि थालेस्मिया या आजाराने ग्रस्त असल्याने पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारासाठी दोन महीन्यांपासून दाखल करण्यात आले आहे. उपचारासाठी 16 लाख रुपयांची गरज आहे कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने जमीयतूल उलमाए हिंद(अरशद मदनी) ग्रुपने पुढाकार घेतला व आज शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजिम यांनी आर्थिक मदतीचा चेक सुपुर्द केला. गरीब रुग्णांना व शिक्षण घेणाऱ्या आणि दंगल पिडितांना नेहमी हि संघटना आर्थिक मदत करते अशी माहिती यावेळी हाफिज अब्दुल अजिम यांनी दिली.
याप्रसंगी जनरल सेक्रेटरी मौलाना कैसर खान बैती, मौलाना युसुफ मिल्ली, मौलाना अब्दुल मतीन नदवी, मौलाना हाफिज खलील, हाफिज इम्रान आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे केले स्वागत...
धार्मिक स्थळाचे सर्वेचे न्यायालयात याचिका दाखल करुन धार्मिक स्थळ सुरक्षा कायदा 1991 चे उल्लंघन करून मस्जिद, दर्गाबाबत याचिका दाखल केली जात होती यामुळे देशाचे वातावरण खराब होण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जमीयतूल उलमाए हिंद अरशद मदनी यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. काय याविषयी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याचे आम्ही स्वागत करतो. यापुढे कोणत्याही याचिका अशा प्रकारे न्यायालयाच्या पुढील निर्णयापर्यंत दाखल करुन घेवू नये असे आदेश दिले असल्याने सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो अशी माहिती यावेळी जमिनीतूल उलमाए हिंदचे शहराध्यक्ष हाफिज अब्दुल अजिम यांनी दिली आहे.
What's Your Reaction?






