जकातच्या पैशातून दोन हजार गरजू कुटुंबाला घरापर्यंत रेशन किट वाटप
 
                                जकातच्या पैशातून दोन हजार गरजू कुटुंबाला घरापर्यंत रेशन किट वाटप
दरवर्षीप्रमाणे सफा बैतूल मालचा उपक्रम, गरजूंना नेहमी मदत करण्यासाठी पुढाकार....
औरंगाबाद, दि.26(डि-24 न्यूज) दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात श्रीमंत लोकांकडून जकातच्या माध्यमातून गरजू व गरीबांना विविध प्रकारे मदत करण्याची इस्लाम धर्मात शिकवण आहे. कोणी अन्नदान करावे, कोणी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी मदत करते. सफा बैतूल माल या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष मुफ्ती अनिसुर्रहमान यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे स्लम वस्तीमध्ये दोन हजार कुटुंबांना एका महीन्याचे रेशन किट सर्वेक्षण करून वाटप केले जाते. आज शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत किटच्या वाटपाची सुरुवात केली. वर्षभर या सामाजिक संघटनेच्या वतीने गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात उपचार व औषधी दिली जाते. मेडीकल कैम्प घेतली जातात, रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी उपक्रम घेतले जातात.
यावेळी मौलाना अब्दुल कदीर मदनी, शकीब खुसरो, काजी खलीलोद्दीन, शाहेद खान, नविद सेठ, मौलाना इम्रान, हाफीज सादीक व टिम यावेळी उपस्थित होते. मुस्लिम धर्मातील लोकांनी मोठ्या प्रमाणात जकात काढून गरजूंना या पवित्र रमजान महिन्यात मदत करावी असे आवाहन यावेळी मुफ्ती अनिसुर्रहमान यांनी केले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            