किराडपूरा वार्डात घेतला निःशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
किराडपूरा वार्डात घेतला निःशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.13(डि-24 न्यूज) किराडपुरा परिसरातील अल्तमश कॉलनी, रहेमानिया काॅलनी, शरीफ काॅलनी, आझाद चौक, बारी काॅलनी येथील नागरिकांसाठी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत माजी नगरसेवक तथा काँग्रेस शहागंज ब्लॉक अध्यक्ष इब्राहिम पटेल यांच्या वतीने निःशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत घेण्यात आले. या शिबिराचा लाभ येथील शेकडो वृध्द व महीलांनी घेतला. दरवर्षी या शिबिराचे आयोजन गरीब रुग्णांसाठी करण्यात येते यंदा ज्या रुग्णांना मोतिबिंदू आहे त्यांची मोफत शस्त्रक्रिया समता फाऊंडेशन व लाॅयन्स नेत्र रुग्णालयाच्या वतीने करण्यात येणार आहे अशी माहिती माजी नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी दिली आहे.
याप्रसंगी ताहेर पटेल, इस्माईल पटेल, शाकेर पटेल, शेख आरेफ, अजमत खान, सय्यद अजहर, शेख रियान, शेषराव जाधव, शेख चांद, शेख अनिस, सय्यद अलताफ, शेख फारुख, सय्यद मोईन, रजियाबी, सुलताना बेगम यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले
.
What's Your Reaction?