औरंगाबाद,... इस्त्राईलचा तीव्र निषेध... पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हजारो लोकांनी केली सामुहिक दुवा

 0
औरंगाबाद,... इस्त्राईलचा तीव्र निषेध... पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हजारो लोकांनी केली सामुहिक दुवा

औरंगाबाद... इज्राईलचा तीव्र निषेध... पॅलेस्टिनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हजारो लोकांनी केली सामुहिक दुवा...डोळे पाणावले...

एक दिवस उजाडेल तेथे शांतता होईल व मस्जिद अल अक्सा फिलिस्तिनच्या ताब्यात येईल - मौलाना इलियास फलाही

औरंगाबाद, दि.28(डि-24 न्यूज)

मस्जिद अल अक्सा व तेथील जमीन हि मुस्लिमांची आहे ज्यावर इज्राईलने अवैध कब्जा केलेला आहे. मागील 75 वर्षांपासून आपल्या हक्कासाठी फिलिस्तिनी नागरिक लढा देत आहेत ते आतंकवादी नाही. तर आतापर्यंत पाच लाख लोकांनी आपला जीव गमावला तर या युध्दात सात हजारांहून अधिक बालक, महीला व निष्पाप लोकांचा जीव इज्राईलने या युध्दात हल्ला करुन घेतला आहे. साठ लाख लोक आपले स्वतःचे घर सोडून अन्य देशांत आश्रय घेऊन शरनार्थीचे जीवन जगत आहेत. गाजा पट्टी पर्यंत मर्यादित या लोकांची घरे आहेत तेथे पण या युध्दात सर्वनाश झाला आहे. खाने व पिण्याच्या पाण्याची सोय नाही घर नाही उघड्यावर लोक राहतात हे मानवीय हक्काचे उल्लंघन नाही का.‌.फिलिस्तिनच्या बाजूने जगातील सर्व देशाने उभे राहायला पाहिजे. इज्राईलने आतंकवादी हल्ल्यासारखे हल्ले करून रुग्णालयात सुध्दा राॅकेट बाॅम्ब टाकून पाचशेहुन जास्त लोकांचा जीव घेतला. आपल्याच देशात तेथील दहा हजार नागरिक कैदी बनवले गेले.

असे वक्तव्य आपल्या भाषणात केरलाचे सोहेल के.के. व ब्रदर सलमान यांनी केले.

एक दिवस उजाडेल तेथे शांतता प्रस्थापित होईल व मस्जिद-ए-अक्सा फिलिस्तिनच्या ताब्यात येईल. असा विश्वास व्यक्त करत म्हटले अन्याय अत्याचार करणाऱ्या इस्त्रायलला जगातून नष्ट करण्याची इच्छा बाळगा, माणसे मारणा-यांना या जमीनीवर जागा नाही असे अध्यक्षीय भाषणात मौलाना इलियास फलाही यांनी सांगितले. इस्त्रायल वांशिक भेदाच्या कारणावरून गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांवर हल्ले करत असून या अमानवीय युध्दात निष्पापापांचा बळी जात आहे. लाखो लोक आपल्याच देशात परके झाले व दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले असून. याचा स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशनने निषेध केला. आमखास मैदानावर मुस्लिम धर्मगुरु, मौलवी व विचारवंत यांनी इस्त्रायलला जगातील सर्वाधिक दहशतवादी देश ठरवत हा लढा मानवतावादाच्या अस्तित्वासाठी असल्याचे वक्त्यांनी सांगितले. लहान मुले व महिलांचे युध्दात शिरकान केले जात आहे. जगापासून खरी माहिती लपवली जात आहे. 1993 साली जो ओस्लो करार झाला होता तेव्हा गाझा पट्टीत शांतता नांदण्यासाठी अपेक्षा होती पण यहुदींच्या वर्चस्वासाठी रक्ताची होळी खेळली जात आहे. यावेळी माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या पॅलेस्टिनी जनतेच्या समर्थनार्थ भाषण ऐकवण्यात आले. सात दशकांपासून पॅलेस्टिनी नागरिकांवर अत्याचार होत असून संयुक्त राष्ट्र संघाला हे कसे दिसत नाही...? आजही साठ लाख लोक निर्वासित झाले आहे. आम्ही भारतीय पॅलेस्टिनी नागरिकांसोबत राहु असे ब्रदर सलमान यांनी आपले मत व्यक्त केले.

 हे युध्द थांबले पाहिजे. निष्पापापांचा जीव जायला नको तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी आज औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आमखास मैदानावर विशेष दुवाचे आयोजन आज दुपारी दोन वाजता एसआयओच्या(स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन) ने केले होते. विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी या कार्यक्रमास पाठिंबा दिला होता.

युध्दात कशा प्रकारे शिशु, बालकांचे जीव जात आहे. उपचारासाठी कशी धडपड तेथील नागरिक करत आहे याचा देखावा विद्यार्थ्यांना यावेळी सादर केला. यावेळी उपस्थित जनसमुदायाने सेव फिलिस्तिनीन, इज्राईलच्या विरोधात घोषणाबाजी केली. भारत सरकारने फिलिस्तिनची मदत करायला पुढे यावे व इज्राईलवर जमीन परत देण्यासाठी दबाव वाढवला पाहिजे अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी भारत फिलिस्तिनचे झेंडे हातात घेत व टि शर्ट घालून युध्दाचा व अन्याय अत्याचाराचा विविध करण्यात आला. दंडावर काळी पट्टी बांधून युध्दाचा निषेध केला. यावेळी लहान मुले व महिलांचीही संख्या लक्षणीय होती. विविध पक्ष संघटनेचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कारी आमीनोद्दीन कादरी यांनी दुवा केली. दुवामध्ये सर्वांचे डोळे पाणावले. 

याप्रसंगी खासदार इम्तियाज जलील, माजी महापौर रशिद मामू, अफसरखान, मोहंमद हिशाम उस्मानी, जावेद कुरैशी, डॉ.गफ्फार कादरी, कदीर मौलाना, इलियास किरमानी, शेख युसूफ, मोहसीन अहेमद, शोएब खुसरो, शारेक नक्शबंदी, नासेर सिद्दीकी, जमीर अहेमद कादरी, आरेफ हुसेनी, फेरोज खान, हामद चाऊस, मुश्ताक अहमद, एस आय ओचे शहराध्यक्ष तन्वीर व पदाधिकारी उपस्थित होते.

भारत सरकारवर खासदार इम्तियाज जलील यांची टिका...

गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी नागरिकांवर होत असलेल्या अन्याव व इज्राईलच्या युध्दात होत असलेला मानवसंहारावर संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने ठराव घेतला यामध्ये दोन्ही देशांतील जनतेचा जीव जाणार नाही. याची दक्षता घ्यावी यामध्ये भारताने उपस्थित न राहिल्याने खासदार इम्तियाज जलील यांनी टिका केली. 120 देश संयुक्त राष्ट्र संघात सदस्य आहेत पण भारताने गैरहजर का राहिले असा प्रश्न उपस्थित केला. निष्पापापांचा मुले, महीलांचा तेथे बळी जात आहे तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी दुवाचे आयोजन करण्यात आले. एसआयओचे त्यांनी आभार मानले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow