मुस्लिम आरक्षण व शैक्षणिक मुद्यांवर बैठक घेतली
मुस्लिम आरक्षण व शैक्षणिक मुद्यांवर बैठक घेतली
औरंगाबाद, दि.10(डि-24 न्यूज) मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील आर्थिक सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण व शैक्षणिक मुद्यांवर काल शनिवारी सुभेदारी विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील बुध्दीजीवी मान्यवरांनी आपली मते मांडली. मुस्लिम आरक्षणाची जुनी मागणी याबाबत मंथन करण्यात आले. न्यायालयीन लढाईबाबत बैठकीत चर्चा झाली. शहरात 16 व 17 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिष्टमंडळाने निवेदन देऊन मागणी करावी असेही मत मांडण्यात आले. ख्वाजा शरफोद्दीन, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी बैठकीत करण्यात आली. मुस्लिम विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद झाल्याने शिक्षणावर परिणाम होत आहे. शिष्यवृत्ती पुन्हा सरकारने सुरू करावी अशीही मागणी यावेळी करण्यात आली. हामद चाऊस यांनी या बैठकीसाठी पुढाकार घेतला.
या बैठकीत इलियास किरमानी, माजी महापौर रशिद मामू, मौलाना अन्वरुल हक इशाअती, माजी नगरसेवक अफसरखान, नासेर सिद्दीकी ,शेख मसूद, एड नवाब पटेल, एड खान सलिम खान, झिया सर, मिर्झा सलिम बेग, अब्दुल रऊफ, एजाज जैदी, नायाब अन्सारी, एड सुफीयान सिद्दीकी, सय्यद अशफाक, अब्दुल अजिम इन्कलाब, एड अजहर पठाण, हाफीज अली, शेख आसेफ, मुन्नाभाई आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?