सत्यशोधक समाज प्रतिष्ठानच्या वतीने 24 सप्टेंबरला अधिवेशन

सत्यशोधक समाज प्रतिष्ठाणच्या वतीने 24 सप्टेंबरला अधिवेशन
औरंगाबाद,दि.10(डि-24 न्यूज) सत्यशोधक समाज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या समारोपनिमित्ताने 24 सप्टेंबरला शहरात अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनात दोन परिसंवाद, ग्रंथाचे प्रकाशन, कार्यकर्ते व लेखकांचा सत्कार तसेच मनोरंजनातून प्रबोधन असे विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड. के.ई. हरिदास यांनी दिली. यावेळी सविता अभ्यंकर, अॅड. वैशाली डोेळस, अॅड. शिवाजीराव शिंदे, प्रा भारत शिरसाट, रमेशचंद्र धनेगावकर, रामदा अभ्यंकर उपस्थित होते.
शहरातील तापडीया नाट्यगृहात 24 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता महात्मा गांशी मिशनचे कुलपती अंकुशराव कदम यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी माजी न्यायमुर्ती बी़. जी़. कोळसे असतील. यामध्ये राज्यातील ख्यातनाम लेखक, विचारवंत व वक्ते सहभागी होणार आहेत. सत्यशोधक समाजाचे योगदान व आजची भूमिका या विषयावर होणाऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. वासुदेव मुलाटे तर वक्ते म्हणून डॉ अरुण शिंदे, डॉ लिलाताई भेले, डॉ उमेश बगाडे असतील. दुसरा परिसंवाद भारतीय संविधानासमोरील आव्हाने विषयावर होईल. अध्यक्षस्थानी प्राचार्य डा़ॅ बी एस चंगोले असतील. तर वक्ते म्हणून सुरेश खोपडे, डॉ. राहूल कोसंबी, डॉ. अनंत राऊत असतील. यावेळी डॉ. अनंत राऊत लिखित भारतीय संविधानासमोरील वर्तमान आव्हाने आणि आंबेडकरवादी चळवळ यशाच्या दिशा या दोन ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. याशिवाय प्रातिनिधीक कार्यकर्ते, लेखकांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी 6 वाजता राजकीय विश्लेषक निरंजन टकले यांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यानंतर मनोरंजनातून प्रबोधन करणारे सत्यशोधक किर्तनकार ज्ञानेश्वर वाबळे महाराज यांचा कार्यक्रम होणार आहे.
What's Your Reaction?






