पशुंच्या वाहतूक नियम शिथील करण्यासाठी मंत्री नितीन गडकरी यांची भेट...

पशुंच्या वाहतूक नियम शिथील करण्यासाठी मंत्री नितीन गडकरी यांची भेट...
नागपूर, दि.9 (डि-24 न्यूज) - महाराष्ट्रातील कुरेशी समाज मागिल दिड महीन्यात पासून संपावर असून त्यांचा बीफ विक्रीचा व्यवसाय बंद असल्याने लाखो लोक बेरोजगार झाले आहे. बंदी नसलेल्या पशुंची वाहतूक करत असताना व्यापा-यांना गाड्या अडवून मारहाण करण्याच्या घटना घडत असल्याने सरकारने व्यापा-यांना संरक्षण द्यावे व त्या समाजकंटकांवर कार्यवाई करावी जे नाहक त्रास देतात. अगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत संघटनेची बैठक मुंबईत झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संप मागे घेण्याचे आवाहन केले. या संपामुळे शेतक-यांना सुध्दा आर्थिक फटका बसत आहे. आज नागपूर येथे केंद्रीय दळणवळण व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्र पशु व्यवसायिक व कुरेशी समाज संघर्ष समितीच्या वतीने भेट घेवून पशु वाहतुकीत भेडसावणा-या अडचणिंवर चर्चा करण्यात आली. शेतकरी व कुरेशी समाज व पशु व्यापारी यांच्या ट्रान्सपोर्ट विषयास निगडित नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन सादर करण्यात आले. यावेळी मंत्री नितिन गडकरी यांनी केंद्रीय सेक्रेटरी स्तरावर समस्या सोडवण्यासाठी बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान, जमीयतूल कुरेशचे हाजी इसा कुरेशी, कलीम कुरेशी, हाजी शम्मू कुरेशी, सलिम कुरेशी, एड वसीम बिस्मिल्लाह कुरेशी आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






