वंचितच्या पदाधिकारी निवडीच्या मुलाखतीसाठी मोठी गर्दी...

वंचितच्या पदाधिकारी निवडीच्या मुलाखतीसाठी मोठी गर्दी...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.9 (डि-24 न्यूज) - वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा, तालुका, महिला, युवा पदाधिकारी निवडीसाठी आज शनिवारी 9 ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीस कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आली. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अरुंधती शिरसाठ यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, शहर सर्व तालुके युवा महिला आघाडीच्या सर्व कार्यकारणी नुकत्याच बरखास्त केल्या आहे. नवीन पदाधिकारी निवडीसाठी 9 ऑगस्ट रोजी मुलाखती घेण्यात याव्यात असेही कळविण्यात आले होते. त्यानुसार पक्षाचे शहर कार्यालय क्रांती चौक येथे सकाळपासून मुलाखतीस सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य अरुंधती शिरसाठ, राज्य कार्यकारणी सदस्य अविनाश भोसीकर, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य दिशा पिंकी शेख अमोल लांडगे यांनी आज सर्व तालुके, जिल्हा कार्यकारणी, शहर कार्यकारणी, महिला कार्यकारणी, युवक कार्यकारणी साठी मुलाखती घेतल्या. जिल्हा व शहरातील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी विविध पदासाठी मुलाखती दिल्या. या मुलाखतीनंतर स्क्रीनिंग समितीकडे नावे जातील त्यात नावे निश्चित केल्यानंतर पक्षाचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर हे अंतिम निर्णय घेणार आहे. पूर्व जिल्हाध्यक्ष, पश्चिम जिल्हाध्यक्ष, शहर (पूर्व) (पश्चिम) (मध्य) महिला आघाडी युवा आघाडी कार्यकारणी मध्ये नवीन चेहऱ्याची वर्णी लागते की तेच पदाधिकारी पुन्हा निवडले जातात याकडे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
What's Your Reaction?






