भाजपा अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस पदी नवाब शहा यांची निवड...
                                भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस पदी नवाब शहा यांची निवड...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.3(डि-24 न्यूज)- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती संभाजीनगर गंगापूर तालुका स्तरावरील भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस पदी नवाब शहा नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल गंगापूर खुलताबाद मतदार संघाचे विद्यमान आमदार प्रशांत बंब व भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष अजीम मणियार, तालुकाध्यक्ष, नईम शहा यांच्यासह तालुक्यातील रतन दादा बत्तीस, कैलास शिंगारे, सदानंद लोंढे, गनी रहमान पटेल, बिलाल महबूब शहा, अशफाक शेख, रईस शहा, अजीम एजाज पठाण तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्वच पदाधिकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
What's Your Reaction?