मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी भाजपाने कंबर कसली, मतदार नोंदणीसाठी तयारी...

मराठवाडा पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची बैठक पार पडली; कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनात आमदार संजय केनेकर यांची महत्वाची भूमिका
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश मराठवाडा विभाग पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी अभियानाची नियोजित बैठक आज मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, सातारा परिसर येथे पार पडली. या बैठकीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थिती हि बैठक संपन्न झाली.
बैठकीत पक्ष संघटनाची बांधणी, आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकांचे नियोजन, मतदार नोंदणी अभियानाची अंमलबजावणी आणि कार्यकर्त्यांचे संघटनात्मक बळकटीकरण यावर सविस्तर चर्चा झाली. भारतीय जनता पक्षाची राष्ट्रवाद, सुशासन आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ ही विचारधारा पदवीधर मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ठोस मार्गदर्शक तत्वे या बैठकीत मांडण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन व समन्वययात आमदार संजय केनेकर यांची महत्वाची भूमिका राहिली. नुकतीच त्यांच्यावर मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणी प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली असून, या बैठकीमुळे त्यांच्या संघटनात्मक कौशल्याची आणि नेतृत्वगुणांची ठळक छाप उमटली. पक्षाचे वरिष्ठ नेतृत्व आणि उपस्थित मान्यवरांनी आमदार केनेकर यांच्या समर्पित कार्याचे विशेष कौतुक केले.
या बैकीत मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. भागवतजी कराड, खासदार डॉ. अजित गोपछडे, राज्यमंत्री श्रीमती मेघनाताई बोर्डीकर, आमदार अनुराधा चव्हाण, संघटन मंत्री संजय कौडगे, प्रदेश सरचिटणीस आमदार विक्रांत पाटील, माजी मंत्री आमदार संभाजी निलंगेकर, सचिव सह नोंदणी प्रमुख राहुल लोणीकर, सह नोंदणी प्रमुख गुरुनाथ मगे, आ. तान्हाजी मुटकुळे, आ. नारायण कुचे, आ. प्रशांत बंब, माजी आमदार अमर राजूरकर, प्रदेश सचिव किरण पाटील, प्रदेश सचिव श्रीमती शालिनी बुंधे, श्रीकांत जोशी, इद्रिस मुलतानी तसेच जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, मंडळ अध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी व नोंदणी संयोजक उपस्थित होते.
What's Your Reaction?






