शहरात उद्यापासून बंगाली असोसिएशनतर्फे दुर्गापूजा...

शहरात उद्यापासून बंगाली असोसिएशनतर्फे दुर्गापूजा उत्सव
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते कार्यक्रमांना सुरुवात होणार...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.27(डि-24 न्यूज)- बंगाली असोसिएशनतर्फे रविवार, दिनांक 28 सप्टेंबर ते गुरुवार 2 ऑक्टोबर दरम्यान सागर लॉन येथे श्री दुर्गा पूजेला मोठ्या उत्साहात व आनंदात साजरे करण्यात येणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने उपाध्यक्ष व दुर्गा पूजा समितीचे चेअरमन ए. के. सेनगुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली 5 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती बंगाली असोसिएशनचे सचिव प्रबिणकुमार घोष यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमाचा उद्या शुभारंभ पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास विकास व दुग्धविकास मंत्री अतुल सावे व खासदार डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
रविवार, 28 सप्टेंबर रोजी महाषष्ठी,
सोमवार, 29 सप्टेंबर रोजी महासप्तमी, मंगळवार 30 सप्टेंबर रोजी महाअष्टमी
बुधवार, 1 ऑक्टोबर रोजी महा नवमी, गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी महादशमी (दशहरा – विजयादशमी) साजरी करण्यात येईल.
घोष यांनी सांगितले की, 30 सप्टेंबर रोजी महाअष्टमीच्या दिवशी दुपारी 1.05 वाजता संधिपूजा होणार असून या वेळी 108 दिवे प्रज्वलित करून व 108 फुले अर्पण करून माता दुर्गेची पूजा केली जाईल.
सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाअष्टमीच्या दिवशी संध्याकाळी धुनुची नृत्य स्पर्धा होणार आहे. तसेच 2 ऑक्टोबर रोजी महादशमी उत्सव साजरा करण्यात येईल. आज दुर्गापूजा निमित्ताने व्यासपीठावर सजावट करण्यात आली. याप्रसंगी प्रितिश चटर्जी, रतन कुमार भौवमी, देव कुमार जाना, कल्याण भट्टाचार्य, सुमन घोष आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?






