मांडकीत इमाम मौज्जन काॅलनीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी केले धरणे आंदोलन
मांडकीत इमाम मौज्जन काॅलनीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी केले धरणे आंदोलन
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) शेकडो एकर वक्फ जमीनीवर अवैध अतिक्रमण झालेले आहे. ज्यांचा हक्क या जमिनीवर असताना धन्नासेठ या जमीनीचा उपयोग करून मजा मारत आहे. ज्यांचा वक्फ कायद्यानुसार हक्क आहे तो समाज वंचित आहेत. म्हणून मागिल तीन वर्षांपासून प्रस्ताव सादर करुन सुध्दा इमाम मौज्जन साठी काॅलनी बनवण्याची मागणी केली तरीही अद्यापपर्यंत वक्फ बोर्डाच्या वतीने निर्णय घेतला नसल्याने आज वक्फ बोर्डाचे मुख्य कार्यालय, पवनचक्की येथे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे जिल्ह्यातील मांडकी गावात येथे गट क्रमांक 66/3 मधून 27 एकर जागा इमाम मौज्जन काॅलनी वसवण्यासाठी दिर्घ मुदतीत भाडे तत्वावर जागा उपलब्ध करून देण्यासाठी 11 सप्टेंबर 2023 रोजी प्रस्ताव दाखल केला आहे. यापूर्वी दिनांक 19 नोव्हेंबर 2020 आणि 13 जानेवारी 2022 रोजी वक्फ मंडळाला जागेसंबंधी अर्ज केले निवेदन दिले. पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे लेखी उत्तर मिळाले नाही म्हणून आज आंदोलन करावे लागले. संघर्ष अल्पसंख्याक कामगार संघटना, इमाम मौज्जन काॅलनी अध्यक्ष यांनी सांगितले शहरातील 826 इमाम मौज्जन व 27 मोअल्लीमची नोंद आमच्याकडे झाली आहे यांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रयत्न आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर वक्फ बोर्डाचे अध्यक्ष व सदस्य यांचा घेराव करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.
याप्रसंगी मौलाना शेख मुसा, मौलाना अमीर हमजा, हफीज सिद्दीक कासमी, सिद्दीकी सलिम, अलीमोद्दीन खान, शेख रफीक, मौलाना फारुख खान, हफीज शेख फहीम, हफीज अमजद खान, हफीज शेख नजमोद्दीन आदी उपस्थित होते.
What's Your Reaction?