कार भाड्याने घेण्याचा बनाव करत केली चोरी, स्थानिक गुन्हे शाखेकडून 72 तासात कार जेरबंद
कार भाडयाने घेण्याचा बनाव करून जबरदस्तीने कार चोरुन नेणारे चोरटे स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद चोरी केलेली कार 72 तासात जप्त ...
औरंगाबाद, दि.11(डि-24 न्यूज) आकाश देविदास कानशेटे वय 25 वर्षे. शिरठोण, ता.कंधार, जि. नांदेड यांनी पोस्टे गंगापूर येथे फिर्याद दिली की, पुणे विमानतळा समोरुन तीन अनोळखी इसमांनी औरंगाबाद येथे जाणे करीता त्यांची मारुती कंपनीची स्वीफ्ट डीझायर कंपनीची कार क्र.MH-12,VT-2130 ही भाडयाने घेवून जात असतांना सदर कार ही औरंगाबाद अहमदनगर हायवे रोडवरील गंगापूर हद्दीतील पेपर मील जवळ येताच कारमधील बसलेले 3 अज्ञात आरोपीतांनी लघुशंका करण्याचे बहाण्याने गाडी थांबवून फिर्यादीस मारहाण करुन फिर्यादीच्या मालकीची स्वीफ्ट डीझायर कार ही जबरदस्तीने चोरुन नेले बाबत तक्रार दिली. यावरून पोलीस ठाणे गंगापूर येथे कलम 394 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांचे निर्देशानुसार नमुद गुन्हयाचा गंगापुर पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखा तपास करित असतांना श्री सतिष वाघ, पोलीस निरीक्षक, यांना गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे सदरचा गुन्हा हा भगवान विश्वनाथ सदर रा. चतारी ता. पातूर जि. अकोला याने त्याचे साथिदारासह केल्याची माहिती मिळाली.
यावरून स्था.गु.शा चे दरोडा व जबरीचोरी पथकाने नमुद आरोपीतांची माहिती घेत असतांना यातील एक आरोपी हा अकोला शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली यावरुन पथकाने रेल्वेस्टेशन परिसरात सापळा लावून आरोपीचा शोध घेत असतांना संशयीत आरोपी हा रस्त्याने जात असतांना पथकाचे निदर्शनास पडताच आरोपीस बेसावध असतांना पथकांने त्याला अत्यंत शिताफीने पकडून त्याचे मुसक्या आवळल्या यावेळी त्याला नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव गोपाल अशोक कोल्हे, वय 32 वर्षे रा. तुलूंगा खुर्द, ता. पातूर, जि. अकोला ह.मु. चक्रधर कॉलनी गुडदीरोड, अकोला असे सांगुन त्यास नमुद गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस करता तो पोलीसांना उडवाउडवीचे उत्तरे देवु लागला यामुळे त्याचेवर अधिक संशय बळावल्याने त्यास विश्वासात घेवुन कसोशिने विचारपूस करता नमुद गुन्हयातील कार ही त्याने त्याचे साथीदारसह चोरी केल्याचे कबुल करून सदर कार ही शहापूर गाव ता. खामगाव जि. बुलढाणा येथे लपवून ठेवली असल्याबाबत माहिती दिली.
यावरून आरोपी गोपाल अशोक कोल्हे, वय 32 वर्षे रा. तुलूंगा खुर्द, ता. पातूर, जि. अकोला ह.मु. चक्रधर कॉलनी गुडदीरोड, अकोला यास नमुद गुन्हयात अटक करण्यात येवुन गुन्हयातील चोरी केलेली स्वीफ्ट डीझायर कार असे एकूण 5,00,000/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हयांचा पुढील तपास गंगापूर पोलीस करीत आहेत.
नमुद कारवाई ही मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली श्री सतिष वाघ, पोलीस निरीक्षक, स्थागुशा, श्री. भगतसिंग दुल्हत, पो.उप.नि. पोलीस अंमलदार नामदेव सिरसाठ, दिपेश नागझरे, संजय घुगे, वाल्मिक निकम,
अशोक वाघ, योगेश तरमळे, संजय तांदळे यांनी केली आहे.
What's Your Reaction?