अल-फरहान मेडीकल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात 801 रक्तदात्यांनी केले रक्तदान

 0
अल-फरहान मेडीकल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात 801 रक्तदात्यांनी केले रक्तदान

अल-फरहान मेडिकल फाउंडेशनच्या भव्य रक्तदान शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद; 801 रक्तदात्यांनी केले रक्तदान

औरंगाबाद,दि.12(डि-24 न्यूज) मागील 11 वर्षाची परंपरा कायम ठेवुन यावर्षी सुध्दा अल फरहान मेडिकल फाउंडेशनच्या वतीने 12 वे मेगा ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय रुग्णालयात विविध आजारने ग्रसत गोरगरीब रुग्णांना सतत रक्ताची गरज भासत असल्याने त्यांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा याकरिता अल-फरहान मेडिकल फाउंडेशनने 10 डिसेंबर रविवार रोजी सकाळी 10 ते रात्री 12 वाजेदरम्यान शहरातील युनुस कॉलनी कटकट गेट रोड, हजरत मोहानी लायब्रेरी बायजीपुरा आणि गांधी भवन सिल्कमिल कॉलनी या तीन्ही ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिरास नागरीकांनी उत्सफुर्त प्रतिसाद देत एकूण 801 रक्तदात्यांनी रक्तदान केले विशेष म्हणजे त्यात 43 महिलांनी सुध्दा रक्तदान केले.

          अल-फरहान मेडिकल फाउंडेशन औरंगाबाद शहरातील विविध शासकीय व इतर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरजु व गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा देवुन औषधी व इतर वैद्यकीय साहित्याची सुध्दा मदत वर्षभर करत असते. आतापर्यंत शहरात रुग्णांना मदतीचा हात म्हणून अकरा वेळेस भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले असुन त्यात नागरीकांनी सुध्दा उत्सफुर्त प्रतिसाद दिलेला आहे.  

          सदरील शिबीरात एकूण 801 रक्तदात्यांचे विविध रक्तपेढी मार्फत रक्त संकलित करण्यात आले असुन त्यामध्ये अनुक्रमे औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रक्तपेढी – 525, लाइन्स रक्तपेढी - 54, लोकमान्य रक्तपेढी – 222 यांनी संकलीत केल्याची माहिती अल-फरहान फाउंडेशनच्या वतीने माहिती देण्यात आली.  

          विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, डॉक्टर व सामाजिक कार्यकर्ते यांनी विविध सामाजिक प्रसार माध्यमांतुन रक्तदान करण्याविषयी जनजागृती करुन शहरातील नागरीकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. सदरील भव्य रक्तदान शिबीरास यशस्वी करण्यासाठी अल-फरहान मेडिकल फाउंडेशनचे जिशान पटेल, निजाम सिद्दीकी, खान रजी, रियाज काजी, नासेर बासमेह, अब्दुल माजेद, रईस अहेमद, शादाब सिद्दीकी, काशिफ सिद्दीकी, काजी हफीज, सय्यद मेहराज, मोहम्मद अल्ताफ, समी सिद्दीकी, नविद खान, अहेसान खान, सय्यद अमिन, फेरोज खान, अन्वर खान यांच्यासह युनुस कॉलनी, बायजीपूरा व सिल्कमिल कॉलनी रेल्वेस्टेशन येथील स्थानिक युवकांनी परिश्रम घेतले.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow