समाधान हेच सर्व दु:खाचे कारण - आर्यिका विकुंदनश्री माताजी
समाधान हेच सर्व दुःखाचे कारण - आर्यिका विकुंदनश्री माताजी
छ. संभाजीनगर(औरंगाबाद), दि.11(डि-24 न्यूज)- खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर राजाबजार येथे दहा दिवसीय पर्युषण महापर्वात आर्यिका विकुंदनश्री माताजी यांनी आज पर्युषण पर्वाच्या चौथ्या दिवशी उदबोधन करताना सांगितले की समाधान हेच सर्व दुःखाचे कारण
अत्याधिक लोभा पासून निवृत्ती म्हणजेच उत्तम शौच धर्म. शौच म्हणजे मनाची सुचिता, पावित्र ,मांगल्य जसे शरीराला आपण स्वच्छ, नीटनेटके ठेवतो तसेच मनालाही निर्मळ ठेवणे महत्त्वाचे आहे. आम्ही पैसा, संपत्ती, सत्ता, वासना यांच्या पूर्ततेलाच सुख समजतो परंतु या प्रत्येक गोष्टीच्या मोहात दुखः जडलेले आहे. जी गोष्ट मर्यादेच्या पलीकडे जाते तिचा अतिरेक केला जातो, तिथे दुःखाची निर्मिती अनिवार्य आहे. कारण जीवनात सर्वात घातक संग्राहक वृत्ती, असमाधान, तृष्णा ही सर्व दुःखाचे मूळ आहे. मानवाच्या अधःपतनाचा प्रारंभच या तृष्षने तुनच होतो. आज आधुनिकतेच्या नावावर सर्व मर्यादाचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्थेसारखी मोठी संस्था मोडकळीस येऊ लागली आहे।
अंतरंग सुचिता जिथे आहे तिथे खरे पावित्र आहे। तोच खरा धर्म आहे ।धर्म बाहेर नाही, मंदिरात नाही, मठ मशिदीमध्ये नाही ,तो शुद्ध अवस्थेत आहे। पवित्र विचारात भावनेत आहे। शौच धर्म आपणास आंतर बाह्य शुद्ध व पवित्र होण्यास प्रेरित करतो। म्हणूनजीवनातील प्रत्येक क्षेत्रात कृतीत मर्यादाचे पालन अनिवार्य आहे। कारण वाईट मार्गाला लावणारी प्रलोभने आज जागोजागी पसरलेली आहेत। उपभोगवादी संस्कृतीचे फार मोठे आक्रमण आपल्या जीवनावर होत आहे। त्यापासून बचाव करण्याकरिता एकमेव मार्ग म्हणजे शौच धर्माचे पालन करणे आहे ।आपण जीवनावश्यक वस्तूंचा गरजेपुरता, जितके हवे त्याचा संग्रह करू शकतो। परंतु त्यावर आसक्त होण्याची आवश्यकता नाही। अधिक परिग्रह संचय करणारी व्यक्ती हमखास क्रोध, मान, माया लोभ , अशी पापे करतोच व दुःखाच्या गर्देत जातो।म्हणून शौच धर्माचे पालन करून शुद्धावस्था प्राप्त करा व सुखी व्हा असेही माताजी सांगितले. यावेळी क्षुल्लिका विजीताश्री माताजी यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्व प्रथम सकाळी आज भगवान शांतीनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. तदनंतर बोलीया प्रारंभ होउन भगवंताचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी होण्याचा मान अॅड.अनिल सौ.अलकादेवी कासलीवाल परिवार हिराकाका यांना मिळाला. तसेच शांतीमंत्राचा मान घेवरचंद किशोर सचिन सुनिल भरत अचित पांडे परिवार बोलठान वाला यांना मिळाला. तर भगवंताला अर्चनाफळ चढवण्याचा पदमावती गृप परिवार यांना मिळाला तर भगवान पुष्पदंत यांचा निर्वाण दिन निमीत्त्त लाडु चढवण्याचा मान दिलीप विकास प्रसन्ना ज्योती कासलीवाल हिराकाका परिवार सर्वऔशधी अभिषेक चा मान राजेंद्र महावीर सागर विशाल पाटनी परिवार उत्त्तम शौच धर्माचा कळस रोहित रुचा रविन्द्र सेठी परिवार यांना मिळाला. तदनंतर दुपारच्या सत्रात आर्यिका विकुंदनश्री माताजी यांच्या उपस्थितीत तत्वार्थसुत्र या ग्रंथाचे पठन करण्यात आले. तसेच संध्याकाळी ६.३० वाजता श्रावक प्रतिकमण व संगीतमय भगवंताची महाआरती करण्यात आली. संपुर्ण कार्यकम नमोकार भक्तीमंडळाच्या साग्रसंतामध्ये करण्यात आला.
संपुर्ण कार्यकम यशस्वी करण्यासाठी खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पार्श्श्वनाथ मंदिर विश्श्वस्थ मंडळ व पर्युषण पर्व समितीने परिश्रम घेतले अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा पियुष कासलीवाल यांनी दिली.
What's Your Reaction?