घरकुलची यादी व्हायरल...मनपात गर्दी करु नये, लाभार्थ्यांना जाहीर प्रकटन प्रसिद्ध झाल्यानंतर संपर्क केला जाईल
घरकूलसाठी पात्र लाभार्थी 42 हजार, घरकुल बनणार फक्त 11 हजार, मनपा प्रशासनासमोर आव्हान
अफवांवर विश्वास ठेऊ नका... दलालांपासून सावधान...एमआयएमचे आवाहन...
औरंगाबाद, दि.12(डि-24 न्यूज) सन 2016 पासून शहरातील बेघरांना घरकुल मिळावे या अपेक्षेने पंतप्रधान आवास योजनेसाठी हजारो गरजू लाभार्थ्यांनी गर्दीत लाईन लाऊन ऑनलाईन अर्ज भरले होते पण लाभार्थ्यांना घरकुल मिळाले नाही. अनेकदा महापालिकेत चकरा माराव्या लागल्या तरीही कार्यवाही होत नसल्याने विविध पक्ष, संघटना यांनी आंदोलन केले. खासदार इम्तियाज जलील यांनी या विषयावर सरकारला धारेवर धरले त्यानंतर प्रशासन कामाला लागले. शासकीय भुखंड उपलब्ध करून देण्यासाठी एक ते दोन वर्षे गेली. नव्याने लाभार्थ्यांचे पुन्हा ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर पंतप्रधान आवास योजनेतील पात्र अपात्र लाभार्थ्यांची यादी टाकण्यात आली. तेथून डाऊनलोड करून हि यादी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गोंधळ उडाला.
D24NEWS ने व्हायरल झालेल्या यादीची पडताळणी केली आहे हि यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र अपात्र लाभार्थ्यांची निवड झालेली हि यादी जाहीर झालेली आहे. हि यादी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संभ्रम वाढला आहे. लाभार्थी मुख्यालयात गर्दी करत असल्याने संबंधित अधिकारी माहिती देण्यासाठी उपलब्ध नसल्याने संभ्रम निर्माण होतो आहे.
केंद्र सरकारच्या निधीतून हे घरकुलचे बांधकाम केले जाणार आहे. अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुंदरवाडी, पडेगाव, हर्सुल व तिसगाव येथे दोन ठिकाणी 11 हजार घरकुल बांधण्यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यानुसार 11 हजार घरकुल बनणार आहे मग व्हायरल झालेल्या यादीनुसार पात्र अर्ज 42 हजार आहे. 44 हजार 400 अर्ज लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. घरकुल 11 हजार, पात्र लाभार्थी 42 हजार... उरलेल्या लाभार्थ्यांचे काय होणार यांना घरकुल कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता मनपा प्रशासनासमोर सर्वांना घरकुल देण्याचे आव्हान आहे.
अडीच लाख रुपये पंतप्रधान आवास योजनेचे कमी होईल व ठरवून दिलेल्या घराची किंमत लाभार्थ्यांना भरावी लागणार आहे. जे लाभार्थी गृहकर्जसाठी पात्र आहे किंवा उरलेली रक्कम डिडि द्वारे जी प्रक्रिया मनपा प्रशासनाची असेल त्यानुसार पैसे भरावे लागणार आहे. मनपा मुख्यालयात लाभार्थ्यांनी गर्दी करु नये. अर्जावर लाभार्थ्यांचा संपर्क नंबर आहे. वर्तमानपत्रात जाहिर प्रकटन दिले जाईल त्यानंतर लाभार्थ्यांना प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी संपर्क केला जाईल अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. जाहीर प्रकटन प्रसिद्ध झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या ठिकाणी घर पाहिजे त्यासाठी चाॅईस अर्ज भरुन घेतले जाईल त्यानंतर लकी ड्रॉ होईल व घराच्या किमतीनुसार 10 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. 12 लाख, 9 लाख 55 हजार, 9 लाख 25 हजार अशी घरकुलची किंमत असणार आहे. पाच ते सहा मजल्यांची हि इमारत असणार आहे. लवकर लाभार्थ्यांना घरकुल मिळावे या प्रतिक्षेत लाभार्थी आहेत. मनपा व संबंधित विभाग घरकुलचे काम करण्यासाठी प्रयत्न करत आहे. वेळोवेळी बैठका घेऊन मनपा आयुक्त जी.श्रीकांत कामाचा आढावा घेत आहे. जिल्हाधिकारी सुध्दा घरकुलच्या कामाचा आढावा घेत वेळोवेळी सूचना देत आहे.
आज मनपा मुख्यालयात लाभार्थ्यांनी गर्दी केली असल्याने एमआयएमची टीम मनपा प्रशासनाच्या मदतीला धावून आली. बाहेर टेबल टाकून लाभार्थ्यांची समजूत काढली. जेव्हा अधिकृत यादी सार्वजनिक केली जाईल. जाहीर प्रकटन प्रसिद्ध झाल्यानंतर लाभार्थ्यांना संपूर्क केला जाईल. प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार आहे. लाभार्थ्यांनी गर्दी करु नये एमआयएमच्या वतीने खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली शहरात पात्र लाभार्थ्यांना मदत करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सहकार्य केले जाईल. लाभार्थ्यांना त्रास होणार नाही त्यांचेपर्यंत योग्य ती अचूक माहिती पोहोचवली जाईल. अफवांवर विश्वास ठेऊ नका, दलालांपासून सावध राहा, मनपा मुख्यालयात लाभार्थ्यांनी गर्दी करु नये असे आवाहन एमआयएमचे नेते नासेर सिद्दीकी यांनी केले आहे.
यावेळी शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी, मा.नगरसेवक जमीर अहेमद कादरी आरेफ हुसेनी, फेरोज खान, युवाचे अध्यक्ष मोहंमद असरार, एम.एम.शेख आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या कार्यालयात माहिती घेण्यासाठी शहाबाजार येथील एक विधवा महीला आली असताना अधिका-यांनी माहिती दिली नाही. मोठ्या अपेक्षेने घरकुलासाठी अर्ज भरले आहे. आतापर्यंत घरकुल मिळाले नाही. बोलताना महिलेच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते. भाड्याच्या घरात राहते. एक दिव्यांग मुलीसोबत वास्तव्यास आहे घरात कमावणारी व्यक्ती नाही. एमआयएमच्या नेत्यांनी यावेळी माहिती दिली. लवकर घरकुल मिळावे अशी मागणी त्या महिलेने केली आहे.
What's Your Reaction?