पडेगावात शांतता, काय घडले वाचा...!

 0
पडेगावात शांतता, काय घडले वाचा...!

पडेगावात लहान मुलांच्या कारणावरून वाद, 5 जखमी... पोलिसांनी परिस्थिती हाताळली...दगडफेकीची घटना 

औरंगाबाद, दि.22(डि-24 न्यूज) लहान मुलांना मारहाण केल्याच्या छोट्याशा कारणावरून पडेगाव भागातील कासंबरी दर्गाह येथे एकाच समाजाच्या दोन गटात लाठ्या काठ्यांसह लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाल्याने तणाव निर्माण झाला. या हाणामारी 5 ते 6 जण गंभीर जखमी झाले आहे. या मारहाणीनंतर एकमेकांच्या घरांवर दगडफेकही करण्यात आली. या घटनेची माहिती मिळाताच छावणी व दौलताबाद पोलिस घटना स्थळी पोहोचले. पोलिस उपायुक्त नितीन बगाटे टिमसह पोहोचले. परिस्थितीत नियंत्रणात आणण्यासाठी 5 ते 6 हॅण्डग्रेनेड फेकून जमावाला पांगविण्यात आले. पोलिसांनी त्वरित कोबिंग ऑपरेशन करून या भागातून 50 हुन अधिक दंगेखोरांना ताब्यात घेतले.

पडेगाव भागातील कासंबरी दर्गाह परिसरातील गल्ली नंबर 2 येथे ही घटना सोमवारी रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान घडली. या बाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलं ही या वस्तीच्या बाजूला असलेल्या एका मोकळ्या मैदानात दुपारच्या वेळी पतंग उडविण्यासाठी गेले होते. या मैदानाच्या एका बाजुला राहणाऱ्या काही नागरिकांनी या लहान मुलांना मारहाण केली. या मारहाणीनंतर सदर नागरिकांना जाब विचारण्यासाठी महिला गेल्या, या महिलांना दमदाटी करण्यात आली. या महिलांना दमदाटी केल्यानंतर या ठिकाणी जमाव जमला.

एका बाजुला राहणाऱ्या जमावाने लहान मुलांच्या कारणावरून गेलेल्यांना मारहाण केली. यानंतर दोन्ही बाजूने जमाव जमा झाला. या जमावाने एकमेकांच्या वस्तींवर दगडफेक केली. तसेच काही जणांनी समोरच्या गल्लीमधील 6 ते 7 घरांची तोडफोड केली. या ठिकाणी 2 जमावांमध्ये तुंबळ हाणमारी होत होती. पोलिस पोहोचताच, पोलिसांनी आधी जमावांना पांगविण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन्ही गटाकडील जमाव हा हटत नव्हता. शेवटी पोलिसांनी हॅण्ड ग्रेनेड फेकून दोन्ही जमावाला पांगविले. जखमींना उपचारासाठी घाटी रूग्णालयात नेण्यात आले. यानंतर पोलिसांनी त्वरित कोबिंग ऑपरेशन करून या ठिकाणी वाद घालून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या 50 ते 60 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सूरू होती.

या भागातील कासंबरी दर्गा येथे असलेल्या दोन गटात नेहमीच वादावादी होत असते. या पुर्वी दोन गटात तुंबळ हाणामारी झाली होती. यानंतर या ठिकाणी नेहमीच वाद होत असतात. सोमवारी झालेला वादाचे रूपांतर हे दंगलीत झाली.

या घटनेत जमील महमूद कुरैशी, नोमान नसीर खान, शेख आरेफ शेख अक्रम, अब्दुल कदीर अब्दुल फहीम, शेख राजू शेख जलील अशी जखमींची नावे आहे. या जखमींचे डोके फुटले असून काही जणांना मुक्का मार बसल्याची माहिती समोर आली आहे.

कासंबरी दर्गाह येथील गल्ली नंबर दोन मध्ये घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांच्यासह छावणी पोलिस निरिक्षक कैलास देशमाने, दौलताबाद पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विनोद सलगरकर यांच्यासह राखीव पोलिस दलासह रॅपीड अक्शन फोर्सची एक तुकडी पोहोचली. पोलिस दल पोहोचल्यानंतर या भागात शांतता प्रस्थापित झाली. सध्या या भागात शांतता आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow