शहर हादरले...साला मेव्हण्याचा खुन, आरोपीला 8 तासाच्या आत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
 
                                शहर हादरले, दुचाकीच्या वादातून दोघांची दगडाने ठेचून खून
आरोपीस 8 तासात पोलिसांनी ठोकल्या बेड्या... दोन्ही मृतक साला मेव्हने आहे...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद),दि.19(डि-24 न्यूज)
दुचाकी परत न दिल्याच्या छोट्याशा कारणावरुन 2 तरुणांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना शनिवार, 19 एप्रिल रोजी बायजीपुरा भागात घडली सकाळी 7 वाजेदरम्यान घडल्याचे उघड झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खून प्रकरणातील आरोपीला सिल्लोड येथून अवघ्या 8 तासाच्या आत अटक केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता बायजीपुरा भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान आरेफ खान (30 वर्ष, राहणार बायजीपुरा), सुलतान शेख ईसा शेख (17 वर्ष, राहणार बायजीपुरा), दोघे रा. गंजेशाहिदा मस्जिदजवळ, बायजीपुरा अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. तर शेख आसीफ शेख हाफिज (24 वर्ष), राहणार सिल्लोड असे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. वापरण्यासाठी दिलेली दुचाकी परत न दिल्याच्या कारणावरुन सलमान खान आरेफ खान याचा शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शेख आसीफ शेख हाफिज याच्यासोबत वाद झाला होता. त्यावेळी शेख आसीफ याने सलमान खान याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सकाळी सात वाजेच्या सुमारास सलमान खान याचा चुलत भावाने सलमान व त्याचा मेव्हणा सुलतान शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला असल्याची माहिती दिली. सलमान खान व सुलतान शेख या दोघांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मयत घोषीत केले.
दरम्यान, या घटनेनंतर शेख आसीफ याने शहरातून धुम ठोकली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर जिन्सी पोलिस, गुन्हेशाखा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करीत तपास करण्यास सुरुवात केली. गुन्हेशाखा पोलिसांनी या घटनेची माहिती सिल्लोड पोलिसांना दिल्यावर सिल्लोड पोलिसांच्या मदतीने शेख आसीफ याला सिल्लोड शहरातून अटक करण्यात आली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात शेख आसीफ याच्याविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई सहाय्यक पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा, छत्रपती संभाजीनगर विनायक शेळके, पोह संदीप तायडे, परभत म्हस्के, पोअं कैलास काकड, विलास मुठे, सहाय्यक पोलीस अधीक्षक(भा.पो.से) मयंक माधव, पोलिस निरीक्षक सिल्लोड शेषराव उदार, पोउनि बाळासाहेब मुंडे, पोना दगडू तडवी, पोकाॅ योगेश मोकळे, रामानंद बुधवंत, मपोआ ममता मोरे, पोलिस स्टेशन सिल्लोड यांनी केली
 
 
आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            