"लबाडांनो पाणी द्या" जनआंदोलन अंतर्गत कट्टा बैठका, चंद्रकांत खैरे उतरले मैदानात
 
                                "लबाडांनो पाणी द्या" जनआंदोलन अंतर्गत कट्टा बैठका
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटीगाठी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.19(डि-24 न्यूज): *"लबाडांनो पाणी द्या" या शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जनआंदोलन अंतर्गत आज 19 एप्रिल रोजी शहरातील विविध ठिकाणी कट्टा बैठका संपन्न झाल्या. शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला.
सिद्धार्थ उद्यान, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, खडकेश्रवर आणि संभाजीनगर लेणी येथे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या शहरातील नागरिकांशी दानवे यांनी पाणी प्रश्नांवर संवाद साधला. शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या"लबाडांनो पाणी द्या" या जन आंदोलनास पाठिंबा देण्याचे आवाहन करत शहराच्या पाणी पुरवठ्याची विस्कळीत झालेल्या व्यवस्थेची अंबादास दानवे यांनी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडली.
10 ते 12 दिवसाला पाणी मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी यावेळी केल्या. तसेच शहराच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आपण चांगले आंदोलन सुरू केले असल्याची भावना व्यक्त करत राज्य सरकार आणि मनपा प्रशासनावर नागरिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपजिल्हाप्रमुख आनंद तांदुळवाडीकर, शहर संघटक सचिन तायडे, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, सुगंधकुमार गडवे, विनायक देशमुख, प्रितेश जैस्वाल, युवासेना सहसचिव ॲड धर्मराज दानवे, शाखाप्रमुख पंकज जोशी, विनय बक्षी, विनोद जगताप, युवासेना उपशहराधिकारी हरीश पाटील, देविदास खरात, अमित लहाने, अजय रेड्डी, मिथिल ढोरकट, युवतीसेना जिल्हा समन्वयक दिपाली पाटील बोरसे, विभाग प्रमुख सुधीर घाडगे, विभागप्रमुख कृष्णाजी पाटील, उपविभागप्रमुख संदीप सपकाळ, गणेश उचडे, शाखाप्रमुख संदीप हिरे, अमोल पवार, उपशाखाप्रमुख घनश्यामजी देशमुख, किरण गणोरे, संजय कचरे, कांबळे काका, दामू शिंदे, अखिल भाई, राजेश लचूरे, नरेश चावडा, राम जाधव, विनोद बैसीये, वाघ काका, राजू काजळकर यांच्यासह शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील खडी रोड देवळाई, मल्हार चौक सातारा परिसर आणि अल्टिमेट जिम क्लब बीड बायपास येथील नागरिकांशी संवाद साधला. संभाजीनगर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपात सुटण्यासाठी आणि या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने व्यापक स्वरूपात हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे संभाजीनगरच्या पाणी प्रश्नांने रौद्ररूप धारण केले असून त्याचे उच्चाटन होण्यासाठी नागरिकांनी " लबाडांनो पाणी द्या" या जन आंदोलनात विराट संख्येने सहभागी होऊन शासनास जनतेची ताकद दाखवून द्या, असे जाहीर आवाहन खैरे यांनी यावेळी केले.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर, शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे पाटिल, अजय चोपडे, प्रमोद ठेंगडे, दिनेशराजे भोसले, सतोष बारसे सतिष पारचे, संजोयण सरोदे, राजुभाऊ जौवाळ, गणेश ढोमर, गुलाब जाधव, बालाजी परदिरवाड, गजले राजु, रुस्तुम शिलेदार, सागर निकम व अनिता लगड उपस्थित होते.
संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदार संघातील छत्रपती महाविद्यालय व किटली गार्डन येथे शिवसेना महानगरप्रमुख राजू यांनी कट्टा बैठका घेऊन या आंदोलनाची माहिती देणारे पत्रके वाटली. संभाजीनगरचा पाणी प्रश्न आणि शहरातील पाणी प्रश्नाची वितरण व्यवस्था सुरळीत होण्यासाठी पुकारलेल्या या जन आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा द्या, असे आवाहन वैद्य यावेळी केले.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपजिल्हाप्रमुख विजय वाघमारे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, कृष्णा मेटे, माजी नगरसेवक आत्माराम पवार, शाखाप्रमुख संदीप शिंदे, ज्ञानेश्वर साठे, महिला आघाडी महानगर संघटक सुकन्या भोसले व शहर संघटक सुनिता औताडे उपस्थित होते.
"लबाडांनो पाणी द्या" जनआंदोलन अंतर्गत उद्या कट्टा बैठका
"लबाडांनो पाणी द्या" या जन आंदोलनातंर्गत 20 एप्रिल रोजी शिवसेना नेते तथा राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे शहरातील विविध ठिकाणी कट्टा बैठका घेण्यात येणार आहे..
शिवसेना नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम विधानसभा मतदार संघातील कट्टा बैठका संपन्न होणार आहे. सकाळी 6.30 वाजता सिग्मा हॉस्पिटल, सकाळी 6.45 वाजता विभागीय क्रीडा संकुल आणि सकाळी 7 वाजता सुधाकर नगर चौक सातारा परिसर येथे दानवे नागरिकांशी पाणी प्रश्नांवर संवाद साधतील. सदरील कट्टा बैठका शहरप्रमुख हरीभाऊ हिवाळे, उपजिल्हाप्रमुख गिरजाराम हाळनोर, किशोर कच्छवाह, उपशहर प्रमुख प्रमुख ठेंगडे, अजय चोपडे व महिला आघाडी जिल्हा संघटक आशा दातार यांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वाखाली मध्य विधानसभा मतदार संघातील कट्टा बैठका संपन्न होणार असून सकाळी सकाळी 6 वाजता हिमायतबाग, सकाळी 6.45 वाजता स्वामी विवेकानंद उद्यान सिडको, सकाळी 7 वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे उद्यान येथे संवाद साधणार आहे. या कट्टा बैठकांचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, उपशहरप्रमुख संदेश कवडे, शेख रब्बानी, गजानन श्रीरामवार व महिला आघाडी महानगर संघटक मीना फसाटे यांनी आयोजन केले आहे.
महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या नेतृत्वाखाली पूर्व विधानसभा मतदार संघातील कट्टा बैठका होणार आहे. सकाळी 6.30 वाजता कारगिल मैदान, सकाळी 6.45 विद्या नगर, सकाळी 7 वाजता एन - क्रिकेट मैदान येथे संवाद साधणार आहे. या कट्टा बैठकांचे उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, संतोष खेंडके, विजय वाघमारे, विधानसभा संघटक दिग्विजय शेरखाने, उपशहरप्रमुख पुरुषोत्तम पानपट, बापू कवळे,रवी गायकवाड महिला आघाडी महानगर संघटक सुकन्या भोसले व शहर संघटक सुनिता सोनवणे यांनी आयोजन केले आहे.
संभाजीनगर वासियांसह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, अंगीकृत संघटना, आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आयोज
 
कांच्या वतीने करण्यात आले आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            