माणूसकी समूहाने पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण महीलेला येरवडा हाॅस्पिटलमध्ये दाखल

माणुसकी समूहाने पोलिसांच्या मदतीने मनोरुग्ण महिलेला येरवडा मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी केले दाखल...
औरंगाबाद, दि.20(डि-24 न्यूज) भिमनगर भावसींगपुरा येथे राहणाऱ्या एक मानसिक रुग्ण महिलेने छावणी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अक्षरश धुमाकूळ घातला होता. तेथील जाणाऱ्या येणाऱ्या पादचाऱ्यांना शिवीगाळ करणे, आरडाओरडा करणे, आणि रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा निर्माण करणे अशा संदर्भातली तक्रार स्थानिक नागरिकांकडून व तीच्या नातेवाईकानकडून पोलिसांना प्राप्त झाली होती. तेव्हा तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी सदर महिलेची रवानगी छावणी पोलीस स्टेशन येथे केली. तिथे त्या महिलेची चौकशी केल्या असता तिला तीन मुली असून दोन मुली विवाहित आहे. व एक मुलगा/मुलगी लहान आहे. नवऱ्याचे निधन झालेले आहे. अशी माहिती तीच्या मुलीने पो.स्टे ला दिली असता तेथील पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था आणि माणुसकी समूहाचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सुमित पंडित यांना ही बाब सांगितली. त्यानंतर सुमित पंडित यांनी पोलिसांच्या मदतीने सदर महिलेला घाटी रुग्णालयात आणून तिथे मानसोपचार विभागात डॉक्टरांना दाखवल्यानंतर डॉक्टरांनी ती मानसिक रुग्ण आहे म्हणून सांगितले. तसेच तिच्या काही वैद्यकीय चाचण्या घेतल्या. पोलिसांच्या मार्फत न्यायालयासमोर तिला दाखल करण्यात आले. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्ट नंबर 16, औरंगाबाद शहर यांनी तिच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करून तिला पुनर्वसनासाठी आणि पुढील औषध उपचारासाठी मानसिक रुग्णालय येरवडा पुणे येथे दाखल करण्याचे आदेश दिले. माणुसकी समूहाने ह्या महिलेला छावणी पोलीस स्टेशन येथील पोलिसांच्या मदतीने 108 च्या रुग्णवाहिकेतून येरवडा पुणे येथे उपचारासाठी दाखल केले. यासाठी पोलीस निरीक्षक कैलास देशमाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक भागिले, पोलीस उपनिरीक्षक डाके, पोलीस हवालदार आशिप शेख, नंदु सुर्यवंशी, तात्याराव शिंदे, दिलीप जाधव, मंगेश शिंदे, मीना जाधव, माणुसकी समूहाचे सुमित पंडित, पूजा पंडित, यांचे या कामी सहकार्य लाभले.
मनोरुग्णांसाठी काम करणे सोपे नाही माणुसकी समुहाची पोलीसांना होतीय मदत..
याप्रकरणी पोलीस निरीक्षक छावणी पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, औरंगाबाद शहरांमध्ये मनोरुग्ण तसेच सिग्नलवर किंवा विविध भागांमध्ये भीक मागणारे यांचे प्रमाण सध्या खूप वाढलेले आहे. दोन वेळचे जेवण फुकट मिळते म्हणून बऱ्याचशा लोकांना घाटी रुग्णालयामध्ये पण आणून सोडल्या जात आहे. आज आपण एवढ्या विकासाच्या तंत्रज्ञानाच्या गोष्टी करत असताना, अशा घटना माणुसकीला काळिमा फासणारे आहेत. तसेच माणसांमधला माणुसकीचा झरा आटत चाललाय असे दिसते. देशमाने असे म्हणाले की, स्वतः यांची जवळचे नातेवाईक यांना रस्त्यावर सोडून देतात आणि यांना बेघर, बेसहारा करतात. एक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजातल्या घटकांनी समोर येऊन या लोकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घेतली पाहिजे.
-------पोलीस निरिक्षक कैलास देशमाने, छावणी पोलीस स्टेशन
What's Your Reaction?






