तंबाखू मुक्ती जनजागृती बाईक रॅलीस नागरीकांचा प्रतिसाद...
 
                                तंबाखुमुक्ती जनजागृती बाईक रॅलीस प्रतिसाद...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.31(डि-24 न्यूज)- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंतर्गत तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज जिल्हा रुग्णालय संभाजीनगर व मेडिकव्हर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीस शहरवासियांनी उत्तम प्रतिसाद दिला व तंबाखुमुक्तीची शपथ घेतली. या रॅलीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर, डॉ. दिपेन शहा, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश लड्डा, दंत चिकित्सक डॉ.अनिता खरात यांनी सहभाग नोंदवला.
मेडिकव्हर हॉस्पिटलच्या आवारात सर्व सहभागी वाहनचालकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. प्रतिकात्मक व्यसनमुक्तीसाठी बलून सोडण्यात आले. जनजागृती पर बाईक रॅली काढण्यात आली त्यामधून व्यसनमुक्ती व व्यसनाचे दुष्परिणाम याची जनजागृती पर बॅनर्स दर्शवण्यात आले. उपस्थित सर्व सदस्यांनी स्वाक्षरी करुन आपला पाठिंबा दर्शवला. उपस्थित सदस्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने डॉ पूनम गिरी, शिल्पा गडकर, वेद शुक्ला, जयदीप रनसिंग यांचे सहकार्य लाभले. रॅलीमध्ये डॉ.जावेद कुरेशी, चंदन गणोरे, डॉ.रवींद्र बोर्डे, डॉ.सूर्यवंशी, श्री.योगेश सोळुंके, श्रीमती निकिता गायकवाड, महेश रोडगे, महेश मरकड, विश्वजीत सोनटक्के, विजय इंगळे, लक्ष्मीकांत माळगे, करण पवार, निलेश लोखंडे, विविध आरोग्य संस्थेचे समन्वयक व मेडिकव्हर हॉस्पिटल मधील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तसेच मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या डॉ. निकिता गायकवाड यांनी स्वाक्षरी मोहीम घेतली. 
                        
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            