पेट्रोल पंप बंद राहणार अफवा पसरली, पेट्रोल पंपावर गर्दी, पंप बंद केले...
 
                                पेट्रोल पंप बंद राहणार अफवा पसरली, पेट्रोल पंपावर गर्दी, पंप बंद केले...
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.10(डि-24 न्यूज) भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. युद्धजन्य परिस्थिती असल्याने पेट्रोल पंप आठ दहा दिवस पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरल्याने शहरातील काही पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी गर्दी केली आहे. कटकट गेट पोलिस मेस रोडवरील पेट्रोल पंप येथे 24 तास सेवा असल्याने आता दिड वाजता येथे वाहनधारकांनी पेट्रोल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. दोन तासात पेट्रोलचा साठा संपल्याने पंप चालकाला पंप बंद करावा लागला तेव्हा वाहनधारक विना पेट्रोल परतले. येथे इंधन भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांनी सांगितले सोशल मिडिया वर कळाले पेट्रोलपंप बंद राहणार असल्याची माहिती मिळाली असल्याने आलो आहे असे त्यांनी सांगितले. परंतु तेल कंपन्या अथवा पेट्रोल पंप असोसिएशन यांनी अधिकृतरित्या पत्र काढून अथवा माध्यमातून अशी कोणतीही माहिती दिली नाही हि केवळ अफवा आहे. ग्रामीण भागातही अशा अफवा पसरवल्या जात असल्याने प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाहनधारकांनी काळजी करु नये सर्व पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा उपलब्ध असल्याची माहिती डि-24 न्यूजच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            