युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दोन दिवस दौरा

 0
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दोन दिवस दौरा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दोन दिवसीय संभाजीनगर जिल्हा दौरा...

शिवसेना पदाधिकाऱ्यांशी शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून साधणार संवाद

छ.संभाजीनगर(औरंगाबाद) दि.24(डि-24 न्यूज) शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व आमदार आदित्य ठाकरे दोन दिवसीय संभाजीनगर जिल्हा दौऱ्यावर येणार असून ता. 25 व 26 ऑगस्ट रोजी शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदार संघात शिवसेना पदाधिकारी व नागरिकांशी संवाद साधणार आहे. 

25 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता सिल्लोड विधानसभा मतदार संघात, सायंकाळी 6 वाजता संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघात, तर 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता पैठण विधानसभा मतदार संघात, दुपारी 12.15 वाजता गंगापूर - खुलताबाद विधानसभा मतदार संघात, दुपारी 2 वाजता वैजापूर विधानसभा मतदार संघात व सायंकाळी 6 वाजता कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकारी व नागरिकांशी ठाकरे संवाद साधणार असल्याची माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow