मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल...

पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल, प्रवाशांसाठी सूचना...
नांदेड, दि. 23(डि-24 न्यूज) -
प्रवाशांच्या माहितीसाठी कळविण्यात येते की कुर्डूवाडी – शेंद्री दरम्यान पूल क्रमांक 389/02 येथील पाण्याची पातळी धोक्याच्या स्तरापेक्षा वाढल्याने व रेल्वे वाहतूक निलंबित झाल्यामुळे खालील गाड्या वळविण्यात येत आहेत :
गाडी क्रमांक 17613 (पनवेल – नांदेड), दिनांक 23.09.2025 रोजी पनवेलहून सुटणारी, ही गाडी दौंड कॅार्ड लाईन – अंकाई – औरंगाबाद-नांदेड मार्गे वळविण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 17614 (नांदेड – पनवेल), दिनांक 23.09.2025 रोजी नांदेडहून सुटणारी, ही गाडी नांदेड – अंकाई – दौंड कॅार्ड लाईन मार्गे वळविण्यात आली आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी व आपल्या प्रवासाची तशी आखणी करावी. होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे. असे आवाहन दक्षिण मध्य रेल्वे नांदेड विभागाने केले आहे.
What's Your Reaction?






