शहरात व पैठणमध्ये माॅकड्रिल, अफवा पसरवणा-यांवर होणार गुन्हे दाखल - जिल्हाधिकारी
 
                                शहरात व पैठणमध्ये माॅकड्रिल, अफवा पसरवणा-यांवर होणार गुन्हे दाखल - जिल्हाधिकारी
छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद),दि.10(डि-24 न्यूज) भारत व पाकिस्तान या देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्याला भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. जम्मू काश्मिर येथील पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यांनी ऑपरेशन सिंदूर राबवत जोरदार एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उध्वस्त केले. त्यानंतर पाकिस्तान भ्याड हल्ले करत आहे. या पार्श्वभूमीवर शहर व जिल्ह्यात माॅक ड्रील करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी दिलिप स्वामी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले शहर आणि जिल्ह्यातील नागरीकांनी घाबरण्याचे कारण नाही.
जिल्हाधिकारी म्हणाले जुने व्हिडिओ, चित्रपटातील व्हिडिओ, रील काढून युध्दाच्या संदर्भात त्याची जोडणी करु नये. अफवा व चुकीच्या बातम्या पसरवू नये. आर्मीचे मुव्हमेंट होत असेल सैन्याची यातायात होत असेल तर त्यांना तातडीने रस्ता मोकळा करून द्यावा. त्यांचे फोटो किंवा व्हिडिओ काढता येणार नाही हा दंडनिय अपराध आहे. अफवा पसरवणा-यांवर कायदेशीर कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
पैठण, छत्रपती संभाजिनगर(औरंगाबाद), अंजिंठा- वेरुळ येथे उद्या माॅकड्रील...
आपल्या जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था आहे. घाबरण्याचे कारण नाही. आपत्कालिन परिस्थितीत संकटकाळी जीव कसे वाचवावे, नागरीकांनीही सतर्कता बाळगावी म्हणून प्रशासनाच्या वतीने माॅकड्रील करण्यात येणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समीतीने आपल्या जिल्ह्यात काही ठिकाणी माॅक ड्रिल घेण्याचा निश्चय केला आहे. त्यामध्ये आज दिनांक 10 मे रोजी ग्रामीण भागात व पैठण येथे सायंकाळी माॅक ड्रील होईल. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) शहरात उद्या 11 मे रोजी 4 ते 6 या कालावधीत काही ठिकाणी माॅक ड्रील करुन नागरीक व प्रशासनाने काय पावले उचलली पाहिजे यासाठी माॅकड्रील करण्यात येणार आहे. माझे जनतेला विनम्र आवाहन आहे कि यामध्ये घाबरुन जाण्याचे कारण नाही उलट संकटकाळी कशा पध्दतीने वागायचे याची माहिती मि
 
ळते.
What's Your Reaction?
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
                    
                
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                                                                                                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                             
                                            