लाचखोर वकील एसीबीच्या जाळ्यात अडकला
लाचखोर वकील एसीबीच्या जाळ्यात अडकला...
30 हजार रूपयांची लाच घेणे भोवले
औरंगाबाद, दि.19(डि-24 न्यूज) तक्रारदार याच्याविरूध्द दाखल असलेल्या भा.द.वी.४९८(अ) च्या गुन्ह्याचे तपास अधिकारी माझ्या परिचयाचे असून गुन्ह्याच्या तपासात तुम्हाला मदत करण्यासाठी तसेच तुमच्या पत्नीचा पुरवणी जबाब न नोंदविण्यासाठी 50 हजार रूपयांची लाच मागून 30 हजार रूपये स्विकारणार्या लाचखोर वकीलाला अॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अॅड. राहुल सांडू भगत, राहणार रवी निवास, नारळी बाग, औरंगाबाद असे लाचखोर वकीलाचे नाव आहे.
तक्रारदार 35 वर्षीय तरूणाविरूध्द पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल आहे. सदरील गुन्ह्याचे तपास अधिकारी हे माझ्या परिचयाचे असून तपास अधिकारी तुमच्या विरूध्द दाखल असलेल्या गुन्ह्यात तुमच्या पत्नीचा पुरवणी जबाब घेणार नाहीत. तसेच गुन्ह्याच्या तपासात तुम्हाला मदत करतील त्यासाठी 50 हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती. तडजोडीअंती 30 हजार रूपये देण्याचे ठरले होते. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने अॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती. अॅन्टी करप्शन विभागाचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संगीता पाटील, पोलिस अंमलदार दिगंबर पाठक, अशोक नागरगोजे, विलास चव्हाण, चांगदेव बागूल आदींच्या पथकाने सापळा रचून लाचखोर अॅड.राहुल भगत यांना 30 हजाराची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
What's Your Reaction?