जीन्सी हद्दीत नवनीत कावत यांच्या पथकाने पकडला 10 लाखांचा प्रतिबंधित गुटखा...!

जीन्सी हद्दीत नवनीत कावत यांची दबंग कारवाई, पकडला दहा लाखांचा गुटखा
औरंगाबाद, दि.3(डि-24 न्यूज) जूना मोंढा येथील अजंठा ट्रेडर्सवर छापा मारुन पोलिस उपायुक्त, झोन-2 नवनीत कावत यांच्या पथकाने दहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करुन दबंग कामगिरी केली आहे.
हि कारवाई आज 3 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता पथकाने केली आहे. गुप्त बातमीदाराने हि माहिती नवनीत कावत यांना दिली त्यांनी शहानिशा करून मोंढा भागात प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आला असल्याचे कळाले. या माहितीवरून छापा मारला.
दुकान मालक, सय्यद माजेद सय्यद फारुख, वय 29, धंदा अजिंठा टोबॅको, रा.मोतीकारंजा, जुना मोंढा,
सैफ युसुफ सैय्यद, वय 22, रा.जाफरगेट, नईम मोहंमद शेख, वय 32, रा.लोटा कारंजा, मोमीनपूरा, अख्तर निजाम पठाण, वय 32, राहणार बशीर नगर, हर्सुल नाल्याजवळ यांना ताब्यात घेऊन दुकान व गोडाऊन मध्ये मिळून आलेला दहा लाखांचा प्रतिबंधित गुटखा व रोख 3 लाख रुपये जप्त करण्यात आले आहे. छापा मारताना प्रतिबंधित गुटखा व सुगंधी तंबाखू व प्रतिबंधित सिगरेट विक्री करताना आढळून आले.
पोलिस उपायुक्त झोन-2 नवनीत कावत यांच्या पथकाने हि कारवाई पोलिस आयुक्त मनोज लोहिया, पोलिस उपायुक्त नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि अमोल म्हस्के, आनंद बनसोडे, हरिष खटावकर, आर.एम.काकड, अन्न सुरक्षा अधिकारी निखिल कुलकर्णी, श्रीपाद टापरे, पोह सुभाष शेवाळे, प्रदीप दंडावते, लालखाँ पठाण, पोअं विशाल सोनवणे, सहदेव साबळे, दिपक जाधव, संदीप बीडकर, विक्रम खंडागळे यांनी केली आहे. या प्रकरणात जीन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती डि-24 न्यूजला मिळाली
आहे.
What's Your Reaction?






