मोठी बातमी, समृध्दी महामार्ग अपघात, दोन आरटिओसह तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

 0
मोठी बातमी, समृध्दी महामार्ग अपघात, दोन आरटिओसह तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मोठी बातमी, समृध्दी महामार्ग अपघात, दोन आरटिओसह तीन जणांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

वैजापूर, दि.15(डि-24 न्यूज) समृध्दी महामार्गावर काल रात्री झालेल्या भिषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला व 23 जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत. या भिषण अपघाताची पोलिस अधीक्षक मनिश कलवानिया यांनी चौकशी केली. या प्रकरणी तीन जणांवर वैजापूर पोलिस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुख्य आरोपी ड्रायव्हर ब्रिजेश कुमार कमलेशसिंग चंदेल, वय 32, रा.सलय्या, शिवपूरी, मध्यप्रदेश, आरटिओ प्रदीप छबुराव राठोड, आरटिओ नितिशकुमार सिध्दार्थ कोणारकर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती डि-24 न्यूजला पोलिस अधीक्षक मनिश कलवानिया यांनी दिली आहे. गुरन 548/23 कलम 304(2), 308, 337, 338, 34, 427 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून कारवाई केली आहे. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. 

अडस पिंपळगाव टोलनाक्याचे पुढे हा अपघात घडला होता.

फिर्यादी व त्यांच्या सोबतचे लोक त्यांच्याकडे टेम्पो ट्राव्हेल्स चालक संदीप रघुनाथ अस्वले हा चालवित असलेल्या टेम्पो ट्राव्हेल क्रं.MH-04,GP2212 च्या पुढे 120 km वेग मर्यादा असलेल्या लेनमध्ये भरधाव वेगात पुढे जाणा-या ट्रक क्रं.MP-09,HH6483च्या चालकास रोडच्या बाजूला उभे असलेल्या आरटीओच्या गाडीतील दोन अधिका-यांनी ट्रकला समृध्दी महामार्गावर हात देऊन थांबविण्याचा प्रयत्न केल्यामुळे ट्रकचालकाने हलगर्जीपणा, निष्काळजीपणे ट्रक ही 120km वेग असलेल्या लेन वरुन अचानक 80km वेग मर्यादा असलेल्या लेन वर घेऊन चा वेग कमी केल्यामुळे आरटीओच्या दोन अधिका-यांमुळे व ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे यातील फिर्यादीच्या व सोबतच्या वर लोकांना गंभीर जखमी करणे व लोकांच्या मरणास कारणीभूत होऊन टेम्पो ट्राव्हेलरची नुकसानीस कारणीभूत झाले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कालवणिया म्हणाले. तपास पोलीस निरीक्षक सतीश वाघ(LCB) करत आहे.

 मयताचे नाव -- 1.तनुश्री लखन सोळसे 2.संगीता विलास अस्वले 3. अंजाबाई रमेश जगताप 4.रतन जमदाडे 5.काजल लखन सोळसे 6.रजनी गौतम तपासे 7. हौसाबाई आनंदा शिरसाट 8. झुंबर काशिनाथ गांगुर्डे 9.अमोल झुंबर गांगुर्डे 10. सारिका झुंबर गांगुर्डे11. मिलिंद हिरामण पगारे 12.दीपक प्रभाकर केकाने

जखमीचे नाव --1. पूजा दीपक अस्वले 2. ज्योती दीपक केकाने 3. माझी आई संगीता दगू मस्के 4. वैष्णवी संदीप अस्वले 5. संदीप रघुनाथ अस्वले 6. युवराज विलास साबळे 7. कमलबाई छबू मस्के 8. दगू सुखदेव मस्के 9. लखन शंकर सोळसे10. गिरजेश्वरी संदीप अस्वले 11. शांताबाई नामदेव म्हस्के 12. अनिल लहानू साबळे 13. तन्मय लक्ष्मण कांबळे 14. सोनाली आप्पासाहेब त्रिभुवन 15. श्रीहरी दीपक केकाने 16. सम्राट दीपक केकाने 17. कमलेश दगू मस्के 18 गौतम भास्कर तपासे 19. कार्तिक लखन सोळसे 20. धनश्री लखन सोळसे 21. संदेश संदीप अस्वले 22. प्रकाश हरी गांगुर्डे 23. शंकर पूर्ण नाव माहित नाही

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow