एसटीच्या वाहतूक नियंत्रकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, काही काळ सिल्लोड आगार बंद...

 0
एसटीच्या वाहतूक नियंत्रकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, काही काळ सिल्लोड आगार बंद...

एसटीच्या वाहतूक नियंत्रकाची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या, काही काळ सिल्लोड आगार बंद...

सिल्लोड, दि.8(डि-24 न्यूज), 

कर्तव्यावर हजर होण्यासाठी गेले असता आगार प्रमुख व दोन सहाय्यक वाहतूक अधिकारी यांनी अपमानित करून जातीवाचक बोलल्याने अपमान सहन न झाल्याने वाहतूक नियंत्रक शरद विठ्ठल भिवसने यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार रोजी शहरातील आनंद पार्क परिसरात दुपारी उघडकीस आली. यानंतर काही काळ सिल्लोड आगार बंद झाले होते. एसटीची वाहतूक थांबली होती प्रवाशांना याचा काही काळ त्रास सहन करावा लागला अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे वाहक चालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी कुटुंबाच्या वतीने करण्यात आली आहे.

या प्रकरणी मयताचे भाऊ पोपट विठ्ठल भिवसने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की ,माझे भाऊ शरद हे सिल्लोड आगारात सहाय्यक वाहतूक नियंत्रक पदावर कार्यरत होते. मागील एक महिन्यापासून हृदयविकाराचा आजार असल्याने ते वैद्यकीय रजेवर होते त्यांची बढती झाल्याने, माझी सिल्लोडलाच नियुक्ती करावी म्हणून त्यांनी विनंती अर्ज सिल्लोड आगारप्रमुखांना दिला.

दरम्यान आज बुधवार रोजी सकाळी 9 वाजता ते हजर होण्यासाठी सिल्लोड आगारात गेले असता, तेथील आगार प्रमुख विजय काळवणे, सहाय्यक वाहतूक अधिकारी किरण अवसरमल व विकास चव्हान त्यांचेकडे गेले असता तुम्ही हजर होण्यासाठी आले असताना असे मळलेले कपडे, पायात चप्पल का घातली, दाढी का केली नाही व आपल्या हुद्द्याचा पोशाख का घातला नाही. असे म्हणून त्यांनी जातीचा उल्लेख करून अपमानित केले. तो अपमान सहन न झाल्याने शरद विठ्ठल भिवसने यांनी दुपारी 12 वाजेच्या सुमारास भराडी रस्त्यावरील एका विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. यास वरील तिघे जबाबदार असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासह आगार प्रमुख विजय काळवणे, किरण अवसरमल व विकास चव्हाण या तिघांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे हे करीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow