अंमली पदार्थ साठा पुरवणा-या बाहेर राज्यातील टोळीचा पर्दाफाश, 77 लाखांचे कोडिंग सिरप जप्त...!
अंमली पदार्थ साठा पुरवणा-या बाहेर राज्यातील टोळीचा पर्दाफाश, 77 लाखांचे कोडीन सिरप जप्त...!
अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाईने खळबळ...
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.15(डि-24 न्यूज)- पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी शहराला नशा मुक्त करण्यासाठी सतत अवैध प्रकारे नशेच्या व्यापार करणाऱ्या विरोधात कारवाई सुरू आहे. शहरात अंमली पदार्थ पुरवणा-या बाहेर राज्यातील टोळीचा पर्दाफाश करुन अटक आरोपिंकडून नशेसाठी वापरले जाणा-या कोडीन सिरपच्या 18,360 बाॅटल, होन्डाई कार, मोबाईल हॅन्डसेट असा एकूण 77 लाख 44 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला असल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलिस आयुक्त प्रविण पवार यांनी दिली आहे.
सविस्तर माहिती अशी 12/9/2025 रोजी पोलिस ठाणे वाळूज अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये छापा कार्यवाही करुन राइट्स कंपनीचे कोडेन घटक असलेले औषधी द्रव्याचा एकूण 2504 बाटल्या व इतर मुद्देमाल असा एकूण 12,43,200 रुपयांचा माल जप्त करुन एकूण विक्री साठा व वितरण मध्ये सहभागी असलेले संघटीत नेटवर्क मधील 41 आरोपींविरुद्ध पोलिस ठाणे वाळूज येथे एनडिपिएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती.
त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 9/10/2025 रोजी आरोपी कल्पेश चंदुलाल अग्रवाल, वय 38, व्यवसाय नोकरी, राहणार पद्मनाभनगर, साक्री रोड, धुळे, सय्यद नबी सय्यद लाल, वय 37, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार जोगेश्वरी, एमआयडीसी वाळूज, छत्रपती संभाजीनगर, ज्ञानेश्वर मनोहर यादव उर्फ माऊली, राहणार जयभवानीनगर, छत्रपती संभाजीनगर, यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे बेगमपुरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक रविकांत गच्चे यांनी दोन आरोपींना अटक केली. धुळे येथील आरोपी कल्पेश अग्रवाल यास मध्य प्रदेश राज्यातील इंदौर येथील दुर्गेश सिताराम रावत, वय 54, राहणार 203, श्रीयांशनाथ अपार्टमेंट, 3/2 RS भंडारी मार्ग, इंदौर याने व गुजरात राज्यातील धर्मेंद्र उर्फ गोपाल खेमचंद प्रजापती, वय 32, राहणार A-39, स्नेहदीप सोसायटी, वेजलपूर पोलिस चौकी जवळ, अहमदाबाद, गुजरात कोडीन सिरपचा साठा पुरवला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस आयुक्त प्रविण पवार यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या तीन टिम धुळे, इंदौर-मध्य प्रदेश व अहमदाबाद गुजरात येथे तपासकामी जावून धुळे व इंदौर येथून नशेसाठी वापरले जाणा-या कोडीन सिरपच्या एकूण 18,360 बाॅटल जप्त केले. दुर्गेश सिताराम रावत, वय 54, राहणार श्रीयांशनाथ अपार्टमेंट, भंडारी मार्ग इंदौर, धर्मेंद्र उर्फ गोपाल खेमचंद प्रजापती, वय-32 राहणार स्नेहदीप सोसायटी, वेजलपूर पोलिस चौकी जवळ अहमदाबाद गुजरात यांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता दोन्ही आरोपिंना 21 ऑक्टोबर पर्यंत पीसीआर मंजूर केला असून तपास सुरू आहे.
सदरील कार्यवाही पोलिस आयुक्त प्रविण पवार, पोलिस उपायुक्त(गुन्हे) रत्नाकर नवले, सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेचे संभाजी पवार, तपास अधिकारी सपोनि रविकांत गच्चे, ज्ञानेश्वर अवघड, संजय बहुरे, विनायक शेळके, पोउपनि संदीप काळे, अर्जुन कदम, सफौ दिलीप मोदी, पोह प्रकाश गायकवाड, अश्रफ सय्यद, अमोल शिंदे, नवाब शेख, पोअ सागर पांढरे यांनी केली आहे.
What's Your Reaction?