जटवाडा रोडवर पुन्हा देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जीवंत काडतुसे जप्त, दोन आरोपी अटक

 0
जटवाडा रोडवर पुन्हा देशी बनावटीचे पिस्तूल, तीन जीवंत काडतुसे जप्त, दोन आरोपी अटक

जटवाडा रोडवर देशी बनावटीचे पिस्तूल व तीन जिवंत काडतुसे जप्त

दोघांना तत्काळ अटक; न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.7 (डि-24 न्यूज) — जटवाडा रोड परिसरातील गॅलेक्सी टर्फ येथे देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून पिस्तूल, काडतुसे तसेच दोन मोबाईल असा एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी (पीसीआर) सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे 5.05 वाजता जटवाडा रोडवरील गॅलेक्सी टर्फ परिसरात पोलिसांना संशयास्पद हालचालींची माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई करत अरबाज अलीम शेख (वय 19, रा. जटवाडा गाव) याची तपासणी केली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे आढळून आली.

पोलिसांनी पिस्तूल व काडतुसांबाबत चौकशी केली असता, हे अग्निशस्त्र खान अय्यान नईम खान (वय 21, रा. जफर पार्क, जटवाडा रोड) याने आपल्याकडे दिल्याचे अरबाजने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी अय्यान खान यालाही ताब्यात घेतले.

तपासादरम्यान अरबाजच्या मोबाईलच्या फोटो गॅलरीमध्ये पिस्तूलचे फोटो व व्हिडीओ आढळून आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात 40 हजार रुपये किमतीचे पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे अंदाजे तीन हजार रुपये आणि दोन मोबाईल फोनचा समावेश आहे.

या प्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 281/2026 अन्वये भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलीस आयुक्तांनी 19 ऑगस्ट 2026 रोजी जारी केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. पुढील तपास मपोउपनि केदार मॅडम करी

त आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow