ब्लॅकमेलिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना जामीन मंजूर...
ब्लॅकमेलिंग प्रकरणातील दोन्ही आरोपींना जामीन मंजूर
ॲड. तारिक, ॲड. झकी शेख आणि ॲड. सय्यद मोईन यांची प्रभावी न्यायालयीन बाजू
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.20(डि-24 न्यूज)- डेटिंग ॲपच्या माध्यमातून दोन महिलांशी मैत्री करून, शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर आक्षेपार्ह व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची मागणी केल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात आज न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने ॲड. तारिक, ॲड. झकी शेख आणि ॲड. सय्यद मोईन यांनी न्यायालयात बाजू मांडली.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तरुणाने डेटिंग ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याची एका महिलेशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री होऊन संबंध निर्माण झाले. मात्र, संबंधित तरुणाने कथितरीत्या महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात एका यूट्यूब चॅनेलच्या मालकाचेही नाव समोर आले होते. व्हिडिओच्या प्रकरणात हस्तक्षेप करून पैसे मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करून आरोपींना अटक केली होती.
प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, आरोपींमध्ये अमीन शेख आणि एका महिलेचा समावेश आहे. न्यायालयाने यापूर्वी दोन्ही आरोपींना २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान, आज न्यायालयाने दोन्ही आरोपींचे जामीन अर्ज मंजूर केले. आरोपींच्या वतीने ॲड. तारिक, ॲड. झकी शेख आणि ॲड. सय्यद मोईन यांनी प्रभावीपणे कायदेशीर बाजू मांडली.
जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नव्हे...!
या प्रकरणातील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेतून स्पष्ट होईल. दोन्ही आरोपींना जामीन मंजूर झाला असला, तरी त्याचा अर्थ त्यांची आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली असा होत नाही.
What's Your Reaction?