अतिक्रमण कारवाई, उद्या कटकट गेट परिसरात वीजपुरवठा बंद राहणार...!

 0
अतिक्रमण कारवाई, उद्या कटकट गेट परिसरात वीजपुरवठा बंद राहणार...!

उद्या कटकट गेट परिसरात लाईट बंद राहणार...

अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी वीजपुरवठा बंद ठेवण्याची महापालिकेची मागणी

छत्रपती संभाजीनगर : शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्याची मागणी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने महावितरणकडे केली आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभाग क्रमांक 3 तर्फे बुधवार, दि. 21 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मोहल्ला जिन्सी पोलीस चौकी ते पिर गैब साहेब चौक तसेच पिर गैब साहेब चौक ते कटकट गेट परिसरात अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि सुरक्षितपणे अतिक्रमण हटविता यावे, यासाठी संबंधित परिसरातील विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात यावा, अशी विनंती महापालिकेच्या वतीने महावितरणच्या जिन्सी उपविभागाकडे करण्यात आली आहे.

यासंदर्भातील पत्रावर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, विभागीय कार्यालय क्रमांक 3 यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow