उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांचा केला सन्मान...!

 0
उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांचा केला सन्मान...!

भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांचा सन्मान...

सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्ती अभियानचा स्तुत्य उपक्रम; पाणी, रुमाल आणि फुलांनी व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव...

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.6(डि-24 न्यूज)- शहरात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर सिग्नलवर उभे राहून वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या सेवेला मानवंदना देत सर्वपक्षीय मुस्लिम आघाडी व नशा मुक्ती अभियान यांच्या वतीने आज एक हृदयस्पर्शी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. भडकल गेट येथे दुपारी 12 वाजता आयोजित कार्यक्रमात वाहतूक पोलिसांना पाण्याच्या बाटल्या, उन्हापासून बचावासाठी रुमाल तसेच फुले देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ एका ठिकाणी मर्यादित न राहता शहरातील विविध प्रमुख चौकांवर जाऊन थेट कर्तव्यावर असलेल्या पोलिसांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला. मिल्क कॉर्नर, मुख्य बस स्थानक, हॉटेल देवप्रिया समोर, बाबा पेट्रोल पंप, नगर नाका, जिल्हा न्यायालय परिसर आणि क्रांती चौक सिग्नल येथेही वाहतूक पोलिसांचा सन्मान करण्यात आला.

संस्थापक अध्यक्ष साजिद मौलाना यांनी यावेळी बोलताना सांगितले की, “40 ते 42 अंश तापमानात दिवसभर उभे राहून वाहतूक पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी आहे. हा छोटासा उपक्रम त्यांच्या सेवेला दिलेली मानवंदना आहे.” तसेच, “अशा उपक्रमांमुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक दृढ होतो,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास साजिद मौलाना, शेख सलीम सर, अब्दुल कय्यूम (पत्रकार), राधाकिशन पंडित, हफीज अली, राहुल शिरसाट, सुधाकर चांदणे, शेख मुकरम, शेख युसुफ, सलीम शहा, एम. ए. रऊफ, जलीस अहमद, खिजर सिद्दिकी,अशोक पगारे आदी मान्यवर उपस्थित होते.

सरचिटणीस शेख सलीम सर यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे आभार मानत भविष्यातही असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्य

क्त केला.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow