कायदा सुव्यवस्थेसोबतच विकास कार्यात पोलिस पाटलांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी दिलिप स्वामी
कायदा सुव्यवस्थेसोबतच विकास कार्यातही...
पोलीसपाटलांनी योगदान द्यावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.14(डि-24 न्यूज)- कायदा सुव्यवस्था राखतांनाच गावाच्या विकासासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीत सहभागी होऊन पोलीस पाटलांनी आपले योगदान द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज सर्व पोलीस पाटलांना दिले.
पोलीस पाटील यांच्याशी आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दुरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधला.या बैठकीस पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, पैठण उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, वैजापूरचे उपविभागीय अधिकारी अरुण जराड, कन्नड तहसीलदार विद्याचरण कडावकर,सोयगावच्या तहसीलदार श्रीमती मनीषा मेने आदी मुख्यलयातून सहभागी झाले तर अन्य उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी व पोलीस पाटील दुरदृष्य प्रणाली द्वारे जिल्ह्यातील तालुका पोलीस स्टेशनमधून सहभागी झाले.
पोलीस पाटलांची आपापल्या गावांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका असते. कायदा सुव्यवस्थेबरोबरच गावांमध्ये बालविवाह प्रतिबंध, कुपोषण निर्मूलन, स्मशानभूमीची सुविधा उपलब्धता, टँकरमुक्त गाव करण्यासाठी विहीर पुनर्भरण, जल पुनर्भरण यासारख्या उपक्रमातही पोलीस पाटील यांनी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांना सहकार्य करावे. पोलीस पाटलांनी ही प्रशासनास तसेच प्राथमिक स्तरावरून पोलीस प्रशासनास सहाय्य करावे असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सूचित केले.
What's Your Reaction?