मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते पूर्व विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन
गृहनिर्माण मंत्री श्री अतुल सावे यांच्या हस्ते पूर्व मतदार संघात विविध विकास कामांचे भूमिपूजन..
छ. संभाजीनगर(औरंगाबाद),दि.16(डि-24 न्यूज ):- महानगरपालिका अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन
राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री श्री अतुलजी सावे यांच्या शुभहस्ते सोमवारी पार पडले. पूर्व मतदार संघातील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथील स्वामी समर्थ केंद्र असलेल्या ठाकरे नगर मधील सामाजिक सभागृह साठी 50 लाख रुपयांचा तर माया नगर येथील सामाजिक सभागृह साठी 20 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या कामांचे देखील आज भूमिपूजन करण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून मंत्री श्री अतुल सावे यांच्या पूर्व मतदार संघात सातत्याने विविध विकास कामे करण्यात येत आहे. अशात छत्रपती संभाजीनगर मनपा वॉर्ड क्र. 78 विद्यानगर अंतर्गत विद्यानगर येथील मनपाच्या खुल्या जागेवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे. वॉर्ड क्र. 80 एन-3/ एन-4 अंतर्गत विवेकानंद हौसिंग सोसायटी येथे मनपाच्या खुल्या जागेवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे. एन-4 तापडिया पार्क येथे मनपाच्या खुल्या जागेवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे. वॉर्ड क्र. 81 ठाकरेनगर अंतर्गत मायानगर येथे मनपाच्या खुल्या जागेवर सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे.
व छत्रपती शिवाजी महाराज खुले मैदान येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे. अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
या प्रसंगी बापू घडामोडे, प्रमोद राठोड, दामू अण्णा शिंदे, माधुरी अदवंत, लक्ष्मीकांत थेठे, विवेक राठोड यांच्या सह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि नागरिकांची उपस्थिती होती.
What's Your Reaction?