आज ईद-ए-मिलादून्नबी, जुलूस-ए-मोहंमदी गुरुवारी

 0
आज ईद-ए-मिलादून्नबी, जुलूस-ए-मोहंमदी गुरुवारी

आज ईद-ए-मिलादून्नबी, जुलूस-ए-मोहंमदी गुरुवारी

छ.संभाजिनगर(औरंगाबाद) दरवर्षी ईद-मिलादून्नबीच्या दिवशी शहरात जुलूस-ए-मोहंमदीचे आयोजन करण्यात येते. श्री गणेश महोत्सव असल्याने व 17 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन असल्याने मुस्लिम बांधवांनी एकतेचा व मानवतेचा संदेश देत जुलूस -ए-मोहंमदी 19 सप्टेंबर, गुरुवारी काढण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समितीचे संयोजक डॉ.शेख मुर्तूझा यांनी दिली आहे.

मागिल दहा दिवसांपासून ईद मिलादून्नबी सणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरात विद्यूत रौषणाई करण्यात आली तर आज गरजूंना भोजन दानाचे आयोजन करण्यात आले होते. 

जूलूस-ए-मोहंमदी हि मिरवणूक गेल्या 34 वर्षांपासून शांततेत व बंधुभावाने मुस्लिम बांधव काढतात. गुरुवारी शहागंज येथील हजरत निजामोद्दीन चौकातून परंपरेनुसार जूलूस काढण्यात येणार आहे. शहरातील विविध भागात फिरून जूलूस हजरत निजामोद्दीन चौकात सांगता होईल. मुस्लिम बांधवांनी जूलूसमध्ये सहभागी होत मानवतेचा संदेश देशवासीयांना द्यावा असे आवाहन डॉ.शेख मुर्तुझा यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow