मल्लांनी रंगवला जिल्हा गणेश महासंघाच्या कुस्तीचा आखाडा

 0
मल्लांनी रंगवला जिल्हा गणेश महासंघाच्या कुस्तीचा आखाडा

मल्लांनी रंगवला जिल्हा गणेश महासंघाच्या कुस्तीचा आखाडा...

जिल्हा परिषदेच्या मैदानावर मल्लांच्या कुस्त्यांची भव्य लक्षवेधी दंगल...

छ. संभाजीनगर(औरंगाबाद) दि.16(डि-24 न्यूज) ऐकमेकांवर मात करत, धुळ चाटविणारे डावपेच अन् मल्लांच्या सहभागाने लक्षवेधी ठरलेला जिल्हा गणेश महासंघाच्या वतीने आयोजित कुस्त्यांचा आखाडा यावर्षी शहरातील मल्लांनी सोमवारी (दि. 16) रंगवला. संभाजीपेठेतील जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित या कुस्त्यांच्या दंगलचे उद्घाटन संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश सरोज प्रदीप जैस्वाल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

कुस्ती स्पर्धेच्या पुर्वीच पावसाने काही काळ रिमझिम हजेरी लावल्याने कुस्तीपटूंचा आनंद द्विगुणीत होत या दंगलीला उत्साहात सुरुवात झाली. दहा रुपयांपासुन तर हजार रुपयांपर्यंत कुस्ती पटुंची दंगल यावेळी रंगल्याने शहरातील खेळाडुंनी या कुस्त्यांच्या दंगलीत मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. कुस्तीपटुंनी कुस्तीच्या आखाड्यात ऐकमेकांना चितपट करत कुस्तीचा आखाडा रंगवला. यावेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू शरद कचरे, चंदू मेघावाले, भाऊसाहेब जगताप, रामेश्‍वर विधाते, डॉ. मुक्तार पटेल, अजीज शेख, जगदीश बरेटीये, धीरज सिद्ध नितीन काबलीये, युवराज डोंगरे, हरसिंग राजपूत, शिवलाल डोंगरे मच्छिन्द्र हरणे, यांनी पंच म्हणून काम पाहिले. जिल्हा श्री गणेश महासंघाच्या वतीने यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चेतन जांगडे, उत्सव समितीचे कार्याध्यक्ष संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, निखिल चव्हाण, चंद्रकांत इंगळे, आदित्य शर्मा, विनायक वेन्नम, प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे, अनिल सोनवणे, संजय राखुंडे यांची उपस्थिती होती. 

उद्या मान्यवरांच्या उपस्थितीत "श्रीं" ची भव्य मिरवणूक...

शतक महोत्सवी श्री गणेश महासंघ उत्सव समिती द्वारा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून आज मंगळवार (दि. 17) रोजी, सकाळी 11.30 वाजता राजाबाजार, श्री संस्थान गणपती येथुन "श्रीं"च्या मुख्य विसर्जन मिरणूकीस प्रारंभ होणार आहे. शहराच्या या मुख्य मिरवणूक संमारंभास शहरातील शहरातील लोकप्रतिनिधींची, प्रशासकीय अधिकारी तसेच श्री गणेश महासंघाचे आजी माजी अध्यक्ष, वरिष्ठ उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष, महिला समिती, चिटणीस, सरचिटणीस, प्रमुख सल्लागार, युवा सचिव यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या उपक्रमात श्री गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शतक महोत्सवी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार उत्सव समितीचे अध्यक्ष ऋषिकेश जैस्वाल, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, अनिल बोरसे, राजेंद्र दाते पाटील, संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, हरीश शिंदे, चंद्रकांत इंगळे, निखिल चव्हाण, विनायक वेंन्नम, मयूर जाधव, राजू मन्सूरी, अक्षय लिंगायत, समीर देवकर, आदित्य शर्मा, विशाल काकडे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, संजय राखूडें, सुमित दंडुके, अनिल सोनवणे यांनी केले आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow